मेंदूचा शोध व बोध : फ्लॅश – बल्ब मेमरी म्हणजे काय ?

मेंदू हा फार डेलिकेटेड अवयव आहे. याला थोडी जरी इजा झाली तरी त्याचे परिणाम फार मोठे असतात. काही वेळा कोणतीच इजा न होतादेखील समस्या निर्माण होतात. त्यातील एक म्हणजे डिमेन्शिया. यामध्ये केवळ स्मृतीभ्रंश होतो असे नव्हे; त्यात आणखी काही लक्षणं किंवा चिन्हं उद्भवतात. स्मृतीभ्रंशाबरोबर व्यक्तीची विचार करण्याची शक्ती कमकुवत होते. स्वतःच्या अंगावर कपडे चढवणे, अन्न ग्रहण करणे अशा दैनंदिन गोष्टीत देखील विचित्र फरक दिसून येतात. एखादा प्रश्न सोडविण्याची क्षमता कमी होते. शिवाय अशी व्यक्ती अधिक भावना प्रधान होते. व्यक्तीची प्रक्षुब्धता अधिक तीव्र होते. एकंदरीत तिचे व्यक्तिविशेष व्यक्तिमत्व बदलते. Brain Discovery: What is Flash-Bulb Memory?

असा हा डिमेन्शिया, तू मान न मान, मै तेरा मेहमान या वृत्तीने स्मृतीभ्रंशाचा हात धरून, शिष्टचाराला कलाटणी देत जबरदस्तीने आक्रमण करतो. यावर आज उपलब्ध असलेल्या औषोधोपचारानी डिमेन्शिया पूर्णपणे बरा होत नाही; परंतु या व्याधीचा प्रभाव व प्रगती यांना खीळ घालण्यासाठी उप्लबध औषध गतिनिरोधकाचे काम करतात. काही गोष्टींचे स्मरण काळ, स्थळ इत्यादी बाह्य गोष्टींशी निगडित असते. स्थळ-काळाशी निगडित असलेल्या स्मरणशक्तीत बिघाड झाला तर पूर्वपरिचित स्थळांचा देखील विसर पडतो. उदा. रस्त्यावर एकटंच फिरत असताना, रस्ता पूर्वपरिचित असला तरी व्यक्ती कोठेही भरकट जाते.

एखादी अघटित घटना घडली त्यावेळी आपण स्वतः कोठे होतो? उदा. कसाबने हॉटेल ताजवर हल्ला केला त्यावेळी आपण स्वत: कोठे होतो; या प्रकाराला फ्लॅश – बल्ब मेमरी म्हणतात. विसरण्याची प्रक्रिया व्यक्तीची मनःस्थिती, चित्तवृत्ति यावर देखील अवलंबून असते. माहितीची नोंद करत असताना व याच माहितीची पुनर्प्राप्ती करताना, या दोन्ही वेळी चित्तवृत्ती एकाच प्रकारची समतोल असेल तर स्मृती-व्यवस्था अधिक सक्षम असते. अशा मूडवर अवलंबून असलेल्या स्मृतीला मूड – स्टेट – डिपेंडन्ट – मेमरी असे म्हणतात..

Brain Discovery: What is Flash-Bulb Memory?