मानवी शरीरात रोज होतो 25 अब्ज रक्तपेशींचा नाश


आपण रोजचे जगत असताना शरीरातील प्रत्क पेशी काम करीत असतात. त्यामुळे त्यांची झीज होतेच. त्यावळी त्यांच्या जागी नव्या पेशी तयार करण्याचे काम शरीर करते. एक प्रकारे शरीराच्या आत पेशी बनवण्याचा कारखानाच सुरु असतो. आपल्या शरीरात एकूण एक लाख अब्ज पेशी आहेत हे आता सिद्ध झालेले आहे. त्यातील तीस हजार पेशी या केवळ रक्ताच्या आहेत. या रक्तपेशींचे सरासरी वय 120 दिवसांचे असते. म्हणजे एकूण तीस हजार अब्ज रक्तपेशी चार महिन्यात तयार होतात. Blood cell in human body changes everyday

म्हणजेच दर चार महिन्यांनी नवे रक्त तयार होते. याचा अर्थ 120 दिवसांत तीन हजार अब्ज पेशी म्हणजेच रोज साधारण 25 अब्ज रक्तपेशींचा नाश होतो. अर्थात एका बाजूने पेशी मृत होत असतात तर दुसऱ्या बाजूने त्यांची निर्मीती सुरु असते. त्यामुळे आपण तग धरुन राहतो. हीच बाब सर्वांत मोठ्या अवयवाचीदेखील सांगता येईल. त्वचा ही सर्वांत मोठी अवयव मानली जाते. आपल्या त्वचेची रोज झीड होत असते. डोक्यातील कोंडा हे त्याचे दृश्य उदाहरण. हा कोंडा म्हणजे एका अर्थाने मृत पेशीच असतात. मात्र त्यावेळी त्याच्या खाली नव्या पेशी आलेल्या असतात. त्यामुळे इजा होत नाही.

स्नान करताना आपण त्वचा चोळतो त्यावेळी त्या पेशी काढून टाकल्या जातात. शरीराच्या अन्य पेशींचीदेखील हीच स्थीती असते. प्रत्येक पेशी ही अणूंनी बनलेली असते. त्या अंगाने विचार केल्यास दर सात दिवसांनी अणूंचे नूतनीकरण होत असते. त्यामुंळे खरे पाहिल्यास आपल्याला सतत नवे शरीर मिळत असते. त्यामुळे या शरीराला मदत करण्यासाठी योग्य व पोषक आहार करणे गरजेचे असते. सिझनमधील फळे खाणे हाच त्यावर उत्तम उपाय मानला जातो.

Blood cell in human body changes everyday

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती