कोविड १९ महामारीच्या फैलावासाठी क्षी जिंगपिंग, WHO च्या सरचिटणीसांना जबाबदार धरा…!!


चीनचे अध्यक्ष क्षी जिंगपिंग आणि WHO चे सरचिटणीस घेब्रेसस यांच्यातील एक वेगळे “कनेक्शन” जगासमोर आले आहे. घेब्रेसस हे मूळचे इथियोपियाचे आहेत. तो देशच आता “लघू चीन” म्हणून ओळखला जातो. हा देश चीनचे आफ्रिका खंडातील “गुंतवणूक द्वार” म्हणून कुप्रसिद्ध झाला आहे. त्यामुळेच घेब्रेसस यांनी चीनचे सर्व शक्तिमान नेते क्षी जिंगपिंग यांना सर्वस्वी अनुकूल भूमिका घेतली आहे. घेब्रेसस हे प्रशिक्षित डॉक्टर नाहीत. ते इथियोपियाचे आरोग्यमंत्री होते….


ब्रँडले ए. थाएर, लिंको हान                                   

कोविड १९ च्या भयानक फैलावाची लक्षणे जानेवारी २०२० च्या सुरवातीच्या आठवड्यातच दिसत असताना चीनमध्येच त्यावर प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय करण्यात आले नाहीत. उलट त्याचे परिणाम जगापासून दडवून ठेवण्यात आले. या गंभीर गुन्ह्यासाठी क्षी जिंगपिंग आणि WHO चे सरचिटणीस टेडरॉस अधॉम घेब्रेसस या दोघांना जबाबदार धरण्यात यावे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या सीमा बंद करून हवाई प्रवासावर बंधने आणली त्यावेळी घेब्रेसस हे चीनमधील महामारी फैलावाची माहिती आणि बातम्या दडविण्यासाठी क्षी जिंगपिंग यांना मदत करत होते. जगापुढे या महामारीची भयानकता पुढे येऊ देण्यात अडथळा आणत होते. कोविड १९ वेगाने पसरत असताना जग किमान १५ दिवस अंधारात ठेवण्यात आले. एक प्रकारे महामारी संपूर्ण जगात फैलावण्यासाठी जगाचे दरवाजे सताड उघडे राहू देण्याचा हा प्रकार होता. यामध्ये क्षी जिंगपिंग आणि घेब्रेसस हे जोडीने भागीदार आहेत. कोविड १९ चा फैलाव वुहानमध्ये झाल्यावर तेथेच रोखण्यात चीन सरकार कमी पडले. जानेवारीच्या मध्यात क्षी जिंगपिंग आणि घेब्रेसस यांची भेट झाली. त्यावेळी फैलावाच्या बातम्या दडविण्यात आणि कोविड १९ ची भयावहता लपविण्यात आली एवढेच नाही तर या सर्व गोष्टी करण्यासाठी घेब्रेसस यांनी क्षी जिंगपिंग यांना मदतच केली. दोन्ही नेत्यांची विशेषत: घेब्रेसस यांची अक्षम्य डोळेझाक संपूर्ण जगाला महागात पडली. वुहानमध्ये कोविड १९ चा फैलाव रोखण्यात चीन सरकार अपयशी ठरत होते आणि घेब्रेसस हे चीनच्या प्रयत्नांची स्तुती करत होते. WHO च्या व्यासपीठाचा घेब्रेसस गैरवापर करत होते. उदाहरण द्यायचे झाले तर कोविड १९ ची पहिली केस नोव्हेंबर २०१९ मध्ये उघडकीस आली. तिची माहिती दडविण्यात आली. त्यानंतर पहिल्यांदा वुहान लॉकाडाऊन करण्यात आले तेथपासून आता संपूर्ण जग लॉकाडाऊनच्या अवस्थेपर्यंत येऊन पोचले आहे आणि चीन अजूनही कोरोना व्हायरसचे मूळ नेमके कशात आहे, हे जाहीर करत नाही. घेब्रेसस हे देखील WHO चे सर्वांत प्रभावी आणि जबाबदार अधिकारी म्हणून क्षी जिंगपिंग यांना जाब विचारत नाहीत.

जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखाचे हे विद्रूप वास्तव आहे. चीनमधील वास्तव मांडण्याचा ज्यांनी प्रयत्न केला, त्यांना पकडण्यात आले किंवा नाहीसे करण्यात आले. चुकीच्या माहितीचा प्रसार करण्यात आला. सत्य दडपडण्यात आले. क्षी जिंगपिंग सरकारने चिन्यांच्या आरोग्याबरोबरच जगाच्या आरोग्याशी खेळ केला आणि घेब्रेसस हे त्याचे मूक साक्षीदार झाले एवढेच नाही तर चीनच्या पारदर्शक आरोग्य धोरणाचे गोडवे गात राहिले.             चीनी हर्बल औषधे आणि पाश्चात्य औषधांचे मिश्रण करून कोरोनावर औषध तयार करा, असे आदेश चिनी डॉक्टरांना क्षी जिंगपिंग यांनी दिले. त्याचवेळी जारी करण्यात आलेल्या सूचीत WHO ने सोयीने बदल केले. चिनी नेटीझन्सना यातील चिनी रुपांतर आणि इंग्लिश रुपांतर यात भेद आढळला. इंग्लिश रुपांतरातून चिनी हर्बल औषधांचा उल्लेख गायब आहे. त्यात फक्त स्मोकिंग, अँटी बयोटिक्सचा समावेश आहे. मार्च अखेरीस या दोन्ही गोष्टी कोरोना व्हायरसवर बेअसर आहेत, हे सिद्ध झाले आहे.              क्षी जिंगपिंग आणि घेब्रेसस यांच्यातील एक वेगळे “कनेक्शन” जगासमोर आले आहे. घेब्रेसस हे मूळचे इथियोपियाचे आहेत. तो देशच आता “लघू चीन” म्हणून ओळखला जातो. हा देश चीनचे आफ्रिका खंडातील “गुंतवणूक द्वार” म्हणून कुप्रसिद्ध झाला आहे. चीनच्या महत्त्वाकांक्षी रोड अँड बेल्ट प्रकल्पात इथियोपिया भागीदार आहे. त्यामुळेच घेब्रेसस यांनी चीनचे सर्व शक्तिमान नेते क्षी जिंगपिंग यांना सर्वस्वी अनुकूल भूमिका घेतली आहे.                                  घेब्रेसस हे प्रशिक्षित डॉक्टर नाहीत. २०१७ मध्ये ते WHO चे सरचिटणीसपदी निवडून आले. त्यापूर्वी ते इथियोपियाचे आरोग्यमंत्री होते. झिंम्बाव्वेचे प्रमुख रॉबर्ट मुगाबे यांना त्यांनी WHO चे सदिच्छादूत नेमले होते. ती नेमणूक वादग्रस्त ठरली होती. तसेच आता झाले आहे. कोविड १९ च्या जागतिक महामारी फैलावाच्या पार्श्वभूमीवर घेब्रेसस यांचे नेतृत्व अपयशी ठरले आहे. जग आरोग्य संकटाच्या खाईत आहे.                          

(1. ब्रँडले ए. थाएर : प्रोफेसर, राज्यशास्र, टेक्सास सँन अँटिनिओ विद्यापीठ,

2. लिंको हान, माजी सदस्य अमेरिकन सेनेट, मूळ चिनी वंशाचे मानवाधिकार कार्यकर्ते.)

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात