मोदींची “विरोध भक्ती” पुन्हा वाढू लागलीय


लिबरल्स आता वेगवेगळे फंडे वापरून मोदींना घेरायला पाहाताहेत. कोरोनाचे निमित्त करून मोदी हे कसे सर्वशक्तिमान नेते बनत चालले आहेत, आपल्या देशाची संघराज्य पद्धती कशी center centric होत चालली आहे, मोदी हे कसे हुकूमशहा बनले आहेत, याचे हे लिबरल्स जड, वजनदार, पैलूदार शब्दांनी वर्णन करायला लागले आहेत. थोडक्यात मोदी हुकूमशहा आहेत, हा त्यांचा जुनाच निष्कर्ष ते नव्याने मांडत आहेत. हुकूमशहाचा शर्ट त्यांनी आधीच शिवून ठेवला आहे. ते आता मोदींना त्यात घालत आहेत…


विनय झोडगे

कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे लेखण्या वाळूत खुपसून बसलेले लिबरल्स पुन्हा मोदींच्या “विरोध भक्ती”मध्ये दंग व्हायला सुरवात झाली आहे. कोरोनामुळे त्यांच्या लेखण्या क्वारंटाइनमध्ये गेल्या होत्या. त्या आता बाहेर यायला सुरवात झाली आहे. निमित्त आहे, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या मुलाखतीचे…!! अमरिंदर सिंग यांनी मद्यविक्रीपासून संघराज्य पद्धती पर्यंत विविध विषयांवर मते मांडली आहेत. त्यात मोदींवर टीका आहे पण त्यात संयमही आहे. अर्थात त्यावरूनच लिबरल्सनी लेखण्या पाजळायला सुरवात केली आहे.

मोदींना फॉलो करणाऱ्यांना भक्त म्हणून हिणवले जाते. तसे हे लिबरल्स मोदींचे “विरोध भक्त” आहेत. म्हणजे मोदींचे anti followers आहेत. मोदी जे बोलतील त्याला आणि जे काही करतील त्याला फक्त विरोध करत राहायचे एवढीच यांची भूमिका आहे. मूळ राजकीय संकल्पना liberalism शी त्यांचा काहीही संबंध नाही.

हे लिबरल्स आता वेगवेगळे फंडे वापरून मोदींना घेरायला पाहाताहेत. कोरोनाचे निमित्त करून मोदी हे कसे सर्वशक्तिमान नेते बनत चालले आहेत, आपल्या देशाची संघराज्य पद्धती कशी center centric होत चालली आहे, मोदींनी राज्यांच्या आर्थिक नाड्या कशा आवळल्या आहेत, ultimately मोदी हे कसे देशाचे Almighty नेते बनले आहेत. म्हणजे हुकूमशहा बनले आहेत, याचे हे लिबरल्स राज्यशास्रीय, समाजशास्रीय, मानववंश शास्रीय, विविध शास्र आंतरशाखीय परिभाषेत जड, वजनदार, पैलूदार शब्दांनी वर्णन करायला लागले आहेत. थोडक्यात मोदी हुकूमशहा आहेत, हा त्यांचा जुनाच निष्कर्ष ते नव्याने मांडत आहेत. हुकूमशहाचा शर्ट त्यांनी आधीच शिवून ठेवला आहे. ते आता मोदींना त्यात घालत आहेत.

कोणत्याही गोष्टीला बौद्धिक मुलामा देण्याची विद्वत्ता साधलेल्या या लिबरल्सचे आणखी एक अतिमौल्यवान वैशिष्ट्य म्हणजे त्यांना
देशाची संघराज्य पद्धती center centric झाल्याचे दिसते पण विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची राजकीय दादागिरीची वर्तणूक दिसत नाही. मोदी हे राज्यांना accountable धरत असतील तर ते लिबरल्सना चूक वाटते पण राज्यांची आर्थिक बेशिस्त, योजनाबाह्य उधळपट्टी, केंद्राकडे pakages मागताना केलेली दादागिरी दिसत नाही…!! बाकीचे सोडा, ममतांची बंगालमध्ये चाललेली अरेरावी आणि मस्ती त्यांना खटकत नाही. कोरोनाचे आकडे लपवा छपवीचा खेळ मुंबई आणि कोलकात्यात बेदरकारपणे चाललाय. त्यामुळे बंगाल आणि महाराष्ट्र ही अख्खी राज्ये कोरोनाच्या धोक्यात रूतत चालली आहेत, हे लिबरल्सना दिसत नाही. दिसतेय ती फक्त मोदींची नसलेली हुकूमशाही…!!

लिबरल्सचे award वापसी पासून असहिष्णुतेपर्यंतचे सगळे फंडे वापरून झाले पण मोदींचा केसही ते वाकडा करू शकले नाहीत. मग आता राज्यशास्रीय, समाजशास्रीय संकल्पनांद्वारे विद्वत्तापूर्ण भाषेत लिबरल्सनी मोदींची “विरोध भक्ती” सुरू केली आहे. छोटे मुद्दे मोठे आणि मोठे मुद्दे छोटे करून सांगायची खुबी त्यांना जमलेली अाहेच. मोदींना सर्वसामान्यांची नाडी समजते. ते सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत बोलतात. त्याला करता येईल, अशी सोपी कृती करायला सांगतात. जागतिक नेत्यांपासून गावाच्या सरपंचांपर्यंत मोदी सगळ्यांशी, अगदी सगळ्यांशी थेट बोलतात. पण… लिबरल्सशी ते अजिबात बोलत नाहीत…!! मग हे त्यांना खटकू नये तर काय…??

या लिबरल्सचे एक वैशिष्ट्य कोणतीही सोपी गोष्ट ते अवघड आणि त्यांच्याच भाषेत सांगायचे झाले तर क्लिष्ट करून सांगतात. सामान्य माणसाला ज्या गोष्टी सरळ दिसतात त्या त्यांना तिरक्या, वाकड्या, गोल, चौकोनी, आयताकृती किंवा अगदी अमिबासारख्या आकार बदलू शकणाऱ्या कोणत्याही form मध्ये दिसतात… पण त्या कधी म्हणजे कधीच सरळ दिसत नाहीत.

सर्व सामान्य माणसांच्या भाषेत याला दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ दिसते पण स्वत:च्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही, असे म्हणतात. पण ही म्हणही या लिबरल्सना लागू होत नाही असे कारण ते सामान्य नसतात तर विद्वान असतात…!!
म्हणूनच मोदींची प्रत्येक गोष्ट त्यांना खटकते.

कोणताही माणूस सर्वगुणसंपन्न असत नाही. तसे मोदीही नाहीत. पण मोदींच्या मूळ अवगुण किंवा दोषांवर बोट ठेवण्यापेक्षा हे लिबरल्स भलतीकडे बोट ठेवून मोदींना झोडत बसतात. यातून मोदींचे काही वाकडे होत नाही पण खरे महत्त्वाचे मुद्दे त्यांच्या टीकेतून निसटून जातात… हे खरे भारतीय संघराज्याचे दुखणे आहे…!!

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती