…जरा याद करो उनकी कुर्बानी


पुण्यातील प्लेगच्या साथीवरून ब्रिटिशांनी एकाच घरातील तिघाही भावांना फाशीवर चढविण्याचा ‘मान’ चाफेकर कुटुंबीयांना मिळाला. कदाचित भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील हा एकमेव प्रसंग असेल! यावर ‘पंजाब केसरी’ लाला लाजपत राय अभिमानाने म्हणाले होते, “Chafekar brothers were, in fact, the founder of the Revolutionary Movement in India.” दामोदर, बाळकृष्ण आणि वासुदेव चाफेकर हे तीन बंधू, ज्यांना ब्रिटीशांनी फासावर चढविले. त्यापैकी ८ मे १८९९ रोजी वासुदेव यांना फाशी देण्यात आली. या स्वातंत्र्ययोद्धांची थोरवी गाणारा हा लेख…


राजेंद्र भामरे, निवृत्त सहायक पोलिस आयुक्त 


यज्ञी ज्यांनी देउनि निजशिर
घडिले मानवतेचे मंदिर
परी जयांच्या दहनभूमिवर
नाहि चिरा नाही पणती
तेथे कर माझे जुळती..
    : बा.भ.बोरकर

1897 साली पुण्यात प्लेग या साथीच्या रोगाने थैमान घातले होते .प्लेगच्या साथीत उपाययोजना करण्यासाठी ब्रिटिश सरकारने रँड या नावाचा अधिकारी नेमला होता .रँड व त्याच्या साथीदारांनी प्लेगच्या नावाखाली जनतेला प्रचंड त्रास दिला ,’भीक नको पण कुत्रे आवर ‘अशी जनतेची परिस्थिती झालेली होती .

लोकमान्य टिळकांनी आपल्या’ केसरी’ या दैनिकातून अनेक अग्रलेखांमधून या घटनेबद्दल निषेध व्यक्त केला होता व सरकारला धारेवर धरलेले होते. जनतेत त्यामुळे प्रचंड क्षोभ झाला होता व त्याचाच परिपाक म्हणजे चाफेकर बंधूंनी रँडचा केलेला वध होय .

इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिचा राज्यारोहणाच्या हिरक महोत्सवा निमित्त म्हणून पुण्याच्या गव्हर्नर हाऊस (आताचे पुणे विद्यापीठ मुख्य बिल्डिंग ) येथे एक समारंभ आयोजित केलेला होता. समारंभातून परत येतांना गणेशखिंड पुणे (विद्यापीठ रोड )येथे चाफेकर बंधूंनी रँड व दुसरा ब्रिटिश अधिकारी ,आयर्स्ट यांचा वध केला. आरोपींना पकडण्यासाठी ब्रिटिश सरकारने वीस हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले त्या बक्षिसाच्या लालसेपोटी गणेश द्रविड व त्याच्या भावाने फ़ितुरी करुन ब्रिटिशांना चाफेकर बंधूंची माहिती दिली. त्यामुळे दामोदर व बाळकृष्ण यांना फाशी देण्यात आली.

चाफेकर बंधूंमधील सगळ्यात धाकटा भाउ वासुदेव चाफेकर (वय १८) याने त्यामुळे द्रविड बंधूंचा पुण्यातील सदाशिव पेठेत खुन्या मुरलीधराच्या देवळाजवळ ,गोळ्या घालून वध केला. या केसमध्ये वासुदेव व त्याच्या मित्रांना अटक करण्यात आली व खटला चालवुन आजचे दिवशी म्हणजे आठ मे १८९९ रोजी वासुदेव हरी चाफेकर यांना फाशी देण्यात आले.

ब्रिटिश काळात एखाद्या घरातील तिघाही भावांना फाशी झालेला हा एकमेव प्रसंग असेल असे मला वाटते. यावर प्रतिक्रिया देताना पंजाब केसरी लाला लाजपत राय म्हणाले होते “Chafekar brothers were, in fact, the founder of the Revolutionary Movement in India.” भारतमातेच्या या तीनही सुपुत्रांचे या निमित्ताने स्मरण करून त्यांना लाख लाख कोटी आदरांजली वाहु या.
(साभार : फेसबुक पोस्ट)

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण