स्वातंत्र्यानंतर सरदार वल्लभभाई यांना जाणूनबुजून विसरण्याचा प्रयत्न केला गेला. त्यांच्या योगदानाचा आदर केला गेला नाही. त्यांना भारतरत्नही दिला गेला नाही आणि त्यांचा सन्मानही केला गेला नाही, असा हल्लाबोल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कॉँग्रेसवर केला. पण आता परिस्थिती बदलली. भारतरत्न पुरस्काराने त्यांचा सन्मान केला गेला आणि आता जगातील सर्वात उंच त्याचा पुतळा आपल्याला बघायला मिळतोय, असेही त्यांनी सांगितले.Deliberately trying to forget Sardar Patel, no respect for contribution, Amit Shah’s criticism of Congress
विशेष प्रतिनिधी
केवाडिया : स्वातंत्र्यानंतर सरदार वल्लभभाई यांना जाणूनबुजून विसरण्याचा प्रयत्न केला गेला. त्यांच्या योगदानाचा आदर केला गेला नाही. त्यांना भारतरत्नही दिला गेला नाही आणि त्यांचा सन्मानही केला गेला नाही, असा हल्लाबोल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कॉँग्रेसवर केला. पण आता परिस्थिती बदलली. भारतरत्न पुरस्काराने त्यांचा सन्मान केला गेला आणि आता जगातील सर्वात उंच त्याचा पुतळा आपल्याला बघायला मिळतोय, असेही त्यांनी सांगितले.
सरदार वल्लभाभाई पटेल यांच्या जयंती आणि राष्ट्रीय एकता दिनानिमित्त गुजरातच्या केवडीयामधील स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे मानवंदना देण्यात आली. यावेळी शहा म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे होत आहेत. यापार्श्वभूमीवर देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होतोय. यामुळे यंदाच्या राष्ट्रीय एकता दिनाला अधिक झळाळी आली आहे. आणि आज सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आहे. स्वातंत्र्यानंतर ब्रिटीशांनी भारताचे अनेक तुकडे करण्याचा प्रयत्न केला. पण ब्रिटीशांचा हा कट सरदार पटेल यांनी उधळून लावला आणि अखंड भारतासाठी लढले.
केवडिया हे फक्त एका ठिकाणाचे नाव नाहीए. तर राष्ट्रीय एकात्मतेचे श्रद्धास्थान आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांचा आकाशाला उंच भिडणारा पुतळा हा भारताच्या उज्ज्वल भवितव्याचा संदेश जगाला देतोय. भारताची एकता आणि अखंडतेला कुणीही ठेच पोहोचवू शकत नाही, असा संदेशही जगाला दिला गेला आहे. शतकानुशतके एकच सरदार होऊ शकतो. तो एक सरदार शतकानुशतके प्रेरणा बनतो, असे शहा म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विटद्वारे सरदार पटेल यांना मानवंदना दिली आहे. संपूर्ण देश आज सरदार पटेल यांना आदरांजली वाहत आहे. सरदार पटेल यांनी ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’साठी आपले जीवन वाहिले. भारत हा एक विविधतेने नटलेले देश आहे. १३५ कोटी जनतेच्या आशा आणि आकांशांची ही भूमी आहे. आपण पत्येकाने आपल्या देशाची मान उंच ठेवण्यासाठी झटले पाहिजे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रेरणेमुळे आज देश बाह्य आणि अंतर्गत आव्हानांचा सामना करण्यास सक्षम आहे.
गेल्या ७ वर्षात देशाने आनावश्यक असलेले अनेक जुने कायदे रद्द केले आहेत. आपण एकजूट राहिल्यास कुठलीही गोष्ट अशक्य नाही. सरदार वल्लभभाई पटेल यांना शक्तीशाली, संवेदनशील, सतर्क, नम्र आणि विकासशील भारत हवा आहे. त्यांनी कायम देशाच्या हितासाठी काम केले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App