विशेष प्रतिनिधी
जम्मू – जम्मू-काश्मीरमध्ये ३७०वे कलम हटविण्यात आल्यापासून एक ज्वालामुखी तयार होत आहे, असे नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. या ज्वालामुखीचा उद्रेक होईल तेव्हा त्याची तीव्रता किती असेल याविषयी त्यांनी भीती व्यक्त केली.Farookh Abdulla targets BJP in J and K
केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांचा दौरा सुरु असताना पाकिस्तानच्या टी२० विश्वकरंडक स्पर्धेतील भारताविरुद्धच्या विजयाचा काश्मीर खोऱ्यात जल्लोष करण्यात आला तो ३७०वे कलम रद्द केलेल्या भाजपला डिवचण्यासाठी होता. ज्यांनी जल्लोष केला त्यांना पाकिस्तानशी काही देणेघेणे नाही. ती मुले, तरुण आहेत आणि त्यांच्या कृतीमुळे भाजपचे डोळे उघडले पाहिजेत. दहशतवाद संपून नवा टप्पा सुरु झाल्याचा दावा भाजप करते, पण परिस्थिती उलटी आहे, असेही अब्दुल्ला म्हणाले.
जाहीर सभेत ते म्हणाले की, ३७० व ३५ अ ही कलमे हटविल्यानंतर एकही गोळी झाडली गेली नाही असा दावा भाजप करते, पण तुम्ही प्रत्येक घरासमोर जवान उभा केलात तर गोळ्या कशा झाडणार? लोकांना गप्प केल्याचे त्यांना वाटत आहे, पण ज्वालामुखी तयार होतो आहे. एके दिवशी तो फुटेल आणि तेव्हा त्याची तीव्रता काय असेल हे देवालाच माहिती. त्यांनी ३७० वे कलम जम्मू-काश्मीरच्या जनतेला परत करावे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App