विशेष प्रतिनिधी
चंडीगड – पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग हे नवा राजकीय पक्ष काढणार असल्याचे निश्चिeत झाले असून पक्षाचे नाव आणि त्याच्या चिन्हासाठी आपण निवडणूक आयोगाकडे अर्ज केला असून एकदा आयोगाने मान्यता दिल्यानंतर अधिकृत घोषणा करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली.Capt. Amrindar will open new party very soon
पत्रकार परिषदेत बोलताना अमरिंदरसिंग म्हणाले की, मी नवा पक्ष स्थापन करतो आहे पण आताच मला त्याचे नाव जाहीर करता येणार नाही. निवडणूक आयोग जेव्हा याला मान्यता देईल तेव्हा मी पक्षाचे नाव आणि चिन्ह देखील जाहीर करेल.
अमरिंदरसिंग यांनी मागील आठवड्यामध्येच नव्या पक्षाच्या स्थापनेचे सूतोवाच केले होते. केंद्र सरकारने कृषी कायद्यांचा मुद्दा मार्गी लावला तर आपण भाजपसोबत देखील आघाडी करायला तयार आहोत असेही त्यांनी म्हटले होते.
दुसरीकडे पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी पुन्हा अमरिंदरसिंग यांच्यावर निशाणा साधला आहे. स्वतःची कातडी वाचविण्यासाठी अमरिंदरसिंग हे पंजाबच्या हिताशी तडजोड करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) हातातील बाहुले बनलेला, भाजपच्या पायावर निष्ठा ठेवणारा नेता आम्हाला मिळाल्याचे सिद्धू यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App