प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातील झपाट्याने वाढलेली लोकसंख्या तसेच नागरी विकास योजनांचा वेग वाढविण्याची गरज लक्षात घेऊन महापालिका आणि नगर परिषदांमधील निर्वाचित सदस्यांच्या संख्येमध्ये वाढ करण्यात येणार आहे.Thackeray-Pawar government’s decision to increase the minimum number of members in Municipal Corporations and Municipal Councils by 17%
या संदर्भातील बैठक बुधवारी पार पडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सध्या महापालिकांतील सदस्य संख्या किमान ६५ सदस्य आणि कमाल १७५ इतकी आहे. तर नगर परिषदांमधील सदस्य संख्या किमान १७ सदस्य तर कमाल ६५ इतकी आहे. महानगरांमधील, लहान नागरी क्षेत्रांमध्ये झालेले रचनात्मक परिवर्तन व नागरी समस्यांची उकल आणि विकास योजनांचा वेग वाढविणे गरजेचे आहे. हे लक्षात घेता यासाठी सर्व कार्यक्षेत्राला योग्य न्याय देण्याच्या दृष्टीने सदस्य संख्या वाढविण्याची आवश्यकता आहे.
पर्यांप्त सदस्य संख्या होणार निश्चित
२०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीच्या आधारावर महापालिका तसेच नगर परिषदांमधील सदस्य संख्या निर्धारित आहे. कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे २०२१ च्या जनगणनेचे निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही. त्यास आणखी काही कालावधी लागणार आहे. या कालावधीत लोकसंख्या वाढीचा सरासरी वेग गृहीत धरुन अधिनियमात नमुद केलेल्या महापालिका व नगरपरिषदांच्या किमान सदस्य संख्येत १७ टक्के इतकी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. किमान सदस्य संख्या वाढविल्यामुळे पुढील सदस्य संख्या देखील वाढेल व त्यामुळे पर्यांप्त सदस्य संख्या निश्चित होईल.
विशेष प्रतिनिधी
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App