विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : जुलै महिन्यातील महापुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी महाराष्ट्र शासनाने कोल्हापूर जिल्ह्याला आजवर 281.8 करोड रुपये मंजूर केले आहेत. कोल्हापूर जिल्ह्याचे कलेक्टर राहुल रेखावार यांनी सांगितले, महापुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. मासेमारीचे नुकसान, पिकांचे नुकसान, जीवितहानी झाली आहे. बऱ्याच लोकांच्या दुकानांचे नुकसान झाले आहे. बऱ्याच लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. तर सरकारने मंजूर केलेली ही रक्कम संबंधित पीडित व्यक्तीच्या बँक अकाउंटमध्ये ऑक्टोबर महिन्याच्या शेवटपर्यंत जमा होईल.
Flood damage to be compensated by end of October: Kolhapur District Collector Rahul Rekha
राहुल रेखावार पुढे म्हणतात, कोल्हापूर जिल्ह्याला पिकांचे नुकसान झाल्याबद्दल सर्वात जास्त नुकसानभरपाई मिळाली आहे. पिकांच्या नुकसान भरपाईसाठी 85 कोटी रुपये शासनाने मंजूर केले आहेत. त्याचप्रमाणे ज्या शेतीचे कायमचे नुकसान झाले आहे त्यांनादेखील याद्वारे नुकसानभरपाई मिळणार आहे. शेती तसेच इतर उद्योगासंबंधित व्यापाऱ्यांनादेखील नुकसानभरपाई मिळणार आहे. त्यासाठी वेगळे 52 कोटी रुपये शासनाने मंजूर केले आहेत.
Uddhav Thackeray and Devendra Fadanavis in Kolhapur : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा गावाबाहेर राहूनच नरसिंहवाडीच्या पूरग्रस्तांची संवाद; फडणवीस मात्र भर पाण्यात नरसिंहवाडीत
स्टेट डिझास्टर रिलीफ फंड यांच्या क्रायटेरियाद्वारे राज्य सरकारने ही रक्कम मंजूर केली आहे. त्याचप्रमाणे मागील महिन्यामध्ये नॅशनल डिझास्टर रिलीफ फंड ची टीम कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागांमध्ये जाऊन परीक्षण केले होते. त्यावेळी लोकांनी अजूनही नुकसान भरपाई मिळाली नाही म्हणून जहाल भूमिका स्वीकारली होती. त्यानंतर एका महिन्याच्या आत ही रक्कम राज्य सरकार कडून जाहीर करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App