प्रतिनिधी
मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मुंबईत ड्रग्स पेडलर्स विरोधात धडाकेबाज कारवाई केल्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई देखील तीव्र होत चालले असून नुकतीच मुंबई गुन्हे शाखा पथक ६ ने एक कारवाई केली आहे. मुंबईतील दहिसर चेक नाका येथून २४ किलो चरस मुंबई गुन्हे शाखा विभागाने जप्त केले आहे. इतकेच नाही तर या २४ किलो चरससह चार जणांना देखील अटक करण्यात आली आहे.Mumbai police action; Four arrested in Dahisar with 24 kg of charas worth Rs 1.5 crore
हे ड्रग्ज राजस्थानहून मुंबईत रस्त्याच्या मार्गे आणले जात होते. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची किंमत १ कोटी ४४ लाख रुपये आहे. या कारवाईत अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये २ पुरुष आणि २ महिलांचा समावेश आहे. हे सर्व आरोपी पवई येथील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. मुंबई गुन्हे शाखेचे पथक एक महिन्यापासून मुंबईच्या प्रवेशद्वाराजवळ सापळा रचून होते. यादरम्यान हे पथक अंमली पदार्थ तस्करांची वाट पाहत होते.
गेल्या आठवड्यात मुंबई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी कक्षाने या आठवड्याच्या सुरुवातीला मध्य प्रदेशातील शामगढ येथून एका औषध उत्पादकाला शोधून अटक केले होते. आरोपीने मुंबईतील ड्रग पेडलरला औषधे तयार केली आणि पुरवली असल्याचे सांगितले गेले. ज्याला एएनसीने जूनमध्ये कोट्यवधी किंमतीच्या औषधांसह अटक देखील केली होती.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App