मुंबईतील बहुचर्चित क्रूझ ड्रग्ज आणि आर्यन खानच्या अटकेची देशभरात चर्चा सुरू आहे. याप्रकरणी एनसीबी ऑफिसर समीर वानखेडे यांच्यावर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत. खंडणी, लाचखोरी आणि बनावट कागदपत्राद्वारे नोकरी मिळवल्यासारख्या गंभीर आरोपांचा यात समावेश आहे. यावर आता राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दादरा नगर हवेलीत बोलताना ते म्हणाले की, अधिकाऱ्यांना धमकावणं योग्य नाही. पंचांची विश्वासार्हता संपायला नको.former CM Devendra Fadnavis Press In Dadara Nagar Haveli Says credibility of Witness should not end, it is wrong to threaten the officials, NCB Should Investigate allegations
प्रतिनिधी
दादरा नगर हवेली : मुंबईतील बहुचर्चित क्रूझ ड्रग्ज आणि आर्यन खानच्या अटकेची देशभरात चर्चा सुरू आहे. याप्रकरणी एनसीबी ऑफिसर समीर वानखेडे यांच्यावर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत.
खंडणी, लाचखोरी आणि बनावट कागदपत्राद्वारे नोकरी मिळवल्यासारख्या गंभीर आरोपांचा यात समावेश आहे. यावर आता राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दादरा नगर हवेलीत बोलताना ते म्हणाले की, अधिकाऱ्यांना धमकावणं योग्य नाही. पंचांची विश्वासार्हता संपायला नको.
LIVE | Addressing public meeting at Silvassa for Dadra & Nagar Haveli #byelection with Hon Union Minister @PRupala ji, @BJP4India National Secretary @VijayaRahatkar tai, other leaders.#BJP4DNH @BJP4DnNH https://t.co/jvkTi9ZKZY — Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) October 26, 2021
LIVE | Addressing public meeting at Silvassa for Dadra & Nagar Haveli #byelection with Hon Union Minister @PRupala ji, @BJP4India National Secretary @VijayaRahatkar tai, other leaders.#BJP4DNH @BJP4DnNH https://t.co/jvkTi9ZKZY
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) October 26, 2021
फडणवीस पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, अधिकाऱ्यांना धमकावणं योग्य नाही. जे साक्षीदार आहेत त्यांची विश्वासार्हता संपेल. अशी कारवाई झाल्यास साक्ष द्यायला पुढे कुणी येणार नाही. पण मी मानतो की काही आरोप झाले आहेत तर एनसीबीने त्यांची चौकशी करावी.
दरम्यान, दादरा नगर हवेलीतील निवडणुकीच्या विषयावर बोलताना ते म्हणाले की, शिवसेना दादरा नगर-हवेलीत मृत्यूच्या लाटेचं राजकारण करत आहे. शिवसेना संधिसाधू आहे. पंतप्रधान मोदींच्या नावावर 56 जागा मिळाल्या आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेले असे हे संधीसाधू आहेत.
मुंबईत शिवसेनेचा इतिहास पाहा. महाराष्ट्राचे सरकार खंडणीखोर सरकार आहे. ते वसुली करतात, ते तुम्हाला इथे हवे आहेत का? ते इथे आले तर नाव महाराष्ट्राचं घेतील आणि काम मुघलांचं करतील, अशी कडाडून टीकाही त्यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App