विशेष प्रतिनिधी
मुंबई : बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या जामिनावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आर्यनचे वकील त्याला जामीन मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे एनसीबीने आर्यनच्या जामिनाला कडाडून विरोध करत उत्तर दाखल केले आहे. AARYAN KHAN: NCB’s petition against Shah Rukh’s manager! Shah Rukh’s manager impresses witnesses; Don’t bail Aryan
या याचिकेत शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी हिचे नाव असून त्यात म्हटले आहे की, “अशा कथित प्रतिज्ञापत्रात मॅनेजर पूजा ददलानीचे नाव स्पष्टपणे नमूद केले आहे. या महिलेने (पूजा ददलानी) तपासादरम्यान साक्षीदारांवर प्रभाव टाकला. एनसीबीचे म्हणणे आहे की, साक्षीदारांना प्रभावित केलं जात आहे त्यामुळेच आर्यन खानचा जामीन फेटाळण्यासाठी ही अत्यंत महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेतला जावा.
आर्यन खानच्या जामीन अर्जावर एनसीबीने कोर्टात उत्तर दाखल केल्यानंतर आता आर्यनच्या लीगल टीमने देखील दोन पानी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे, अर्जदाराचा सध्या सार्वजनिक/सोशल मीडियावर होत असलेल्या आरोप आणि प्रतिआरोपांशी काहीही संबंध नाही. आर्यन खानचा प्रभाकर सईलशी कोणताही संबंध नसल्याचेही यावेळी सांगण्यात आले. जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान आर्यन खानच्या कायदेशीर पथकाकडून प्रतिज्ञापत्रावर भर दिला जाणार आहे.
आर्यन खानच्या जामीन अर्जावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आर्यन खानच्या जामीन अर्जावर एनसीबीने सांगितले की, रियाच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले होते की, एनडीपीएस कायद्यांतर्गत सर्व गुन्हे अजामीनपात्र आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App