विशेष प्रतिनिधी
मुंबई – हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री मिनू मुमताज (वय ७९) यांचे नुकतेच निधन झाले. कॅनडात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्रीच्या मृत्यूची माहिती त्यांचे भाऊ अन्वर अली यांनी दिली आहे. त्यांच्या पश्चात तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.Veteran Hindi film actress Minu Mumtaz passes away
मिनू मुमताज या लोकप्रिय कॉमेडियन, निर्माते मेहमूद यांची बहीण होत्या. मिनू मुमताज यांचा जन्म २६ एप्रिल १९४२ रोजी झाला. मिनू मुमताज यांचे संपूर्ण कुटुंब चित्रपटांशी जोडले गेले होते, त्यामुळे मिनूही चित्रपटांमध्ये झळकल्या.
मिनू मुमताज यांनी १९५५ साली ‘घर घर में दिवाळी’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण त्यांना खरी ओळख मिळाली ती ‘सखी हातीम’ या चित्रपटातून. यामध्ये त्यांनी जलपरीची भूमिका साकारली होती. मिनू मुमताज यांनी सख्खे भाऊ मेहमूदसोबत १९५८ च्या हावडा ब्रिज चित्रपटातही काम केले.
पुढे मिनू मुमताज यांनी पडद्यावर कॉमेडी भूमिका अधिक केल्या. त्यांनी १९६३ मध्ये दिग्दर्शक एस अली अकबरशी लग्न केले. गेली काही वर्ष त्या चित्रपटसृष्टीपासून लांब होत्या. मिनू बऱ्याच काळापासून कॅनडात वास्तव्यास होत्या.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App