वृत्तसंस्था
मुंबई : माजी गृहमंत्री, माजी मुंबई पोलिस आयुक्त यांचे कुठे हनीमून सुरु आहेत ते शोधा, असा हल्लाबोल अमृता फडणवीस यांनी केला आहे. अमृता फडणवीस या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आहेत.
भारताने कोरोनाविरोधी लसीकरणाचा १०० कोटी डोस देण्याचा टप्पा पूर्ण केला.त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर निशाणा साधताना त्या म्हणाल्या, त्यांचे कुठे हनीमून सुरू आहेत हे शोधून काढायला हवे. माध्यमांना जर ते कळले तर तुम्ही त्याबाबात यंत्रणांना रिपोर्ट करा, म्हणजे त्यांना लवकरात लवकर पकडता येईल.”
त्या म्हणाल्या, “महाराष्ट्र प्रगतीत पुढे जावं की ड्रग्स कॅपिटल बनावं हे आपल्यालाच ठरवावं लागणार आहे. ड्रग्सच्या विळख्यात अडकलेल्या तरूणांना तुरुंगात टाकलं जावे, हा माझा वैयक्तिक विचार नाही, परंतु त्यांना त्यातून बाहेर काढायला नको का? त्यांच्यापर्यंत ड्रग्स येतात कुठून, त्याचं नेटवर्क याबाबत माहिती मिळाली पाहिजे. या मुलांच्या समुपदेशनाची आणि त्यांना सुधारगृहात ठेवण्याची गरज असते,” असंही त्यांनी नमूद केलं.
महाविकास आघाडी सरकारवरील टीकेचे समर्थन करताना त्या म्हणाल्या, “तुम्ही कामं तशी करत आहात म्हणून तुमच्यावर आरोप केले जात आहेत. तुम्ही भजन म्हणताय म्हणून तुमच्यावर आरोप केले जात नाहीत ना? जर तुम्ही जलयुक्त शिवारवर आरोप करू शकता, तर आम्ही समोर दिसतंय त्यावर आरोप करायचे नाही का?,” असंही त्या म्हणाल्या. आम्ही महाराष्ट्राच्या हिताचं बोलत असून चुकीचं घडल्यास गप्प बसणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं. । शिवसेनेचं मुखपत्र सामनावरही निशाणा साधला. “ते भाजपवर टीका करणार. राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर टीका केली तर त्यांचे वसूली सरकार कसे चालणार?,” असं म्हणत त्यांनी टोला लगावला.
– माजी गृहमंत्री, पोलिस आयुक्तांचे हनीमून कोठे ? – दोघांचा पत्ता सापडला तर कळविण्याचे आवाहन – सरकारवर टीका, आरोप हे त्यांच्या कृत्यामुळेच – समोर दिसतंय तर टीका तर होणारच, केली जाईल – सामाना भाजपवर टीका करणार नाही तर कोणावर ? – राष्ट्रवादी, काँग्रेसवर टीका केली तर त्यांचे वसुली सरकार कसे चालणार?
devendra fadnavis wife amruta fadnavis slams mahavika aghadi government anil deshmukh parambir singh
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App