विशेष प्रतिनिधी
कोलकता – बांगलादेशमधील दुर्गापूजा देखावे तसेच मंदिरांवर झालेल्या हल्ल्यांमुळे बंगालमधील विविध क्षेत्रांतील दिग्गज दुखावले आहेत. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना उद्देशून खुले पत्र जारी करण्यात आले आहे. हल्लेखोरांना शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी याद्वारे करण्यात आली. West Bengal lariats wrote letter to Bangala PM
या पत्रावर साठहून अधिक दिग्गजांनी सह्या केल्या आहेत. विविध ठिकाणी दुर्गापूजा देखाव्यांवर हल्ले झाल्याने आणि अनुचित घटना घडल्यामुळे बांगलादेशमधील हिंदू धर्मीयांना आपला सर्वांत मोठा सण सुरळीतपणे साजरा करता आला नाही याबद्दल खेद व्यक्त करण्यात आला.
बांगलादेश सरकार आणि पोलिसांनी तातडीने हालचाली केल्यामुळे आणखी मोठे संकट नक्कीच टाळले गेले, पण १९७१च्या मुक्तीसंग्रामामुळे प्रज्ज्वलित झालेल्या मुक्त तसेच धर्मभेदरहित वंगबंधुत्वाच्या विचारसरणीला विरोध करण्याचे प्रयत्न व्यथित करणारे आहेत. त्यामुळे मानवतेवर श्रद्धा ठेवणारे जागरूक लोक दुखावले गेले आहेत, असे नमूद करण्यात आले.
अल्पसंख्याक समुदायाला आपल्या जीव तसेच मालमत्तेचे रक्षण तसेच स्वतःच्या धर्माचे आचरण करणे शक्य व्हावे याची जबाबदारी बहुसंख्याक समुदायावर असते, असे आग्रही मत पत्रात व्यक्त करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App