सेक्स डीटर्मिनेशन टेस्टला सामोरे जावे लागलेल्या काही महिला खेळाडूबद्दल

विशेष प्रतिनिधी

झी 5 वर प्रदर्शित झालेल्या रश्मि रॉकेट या सिनेमामुळे क्रीडा क्षेत्रातील सेक्स परफॉर्मन्सआणि  जेंडर टेस्ट या दोन गोष्टींनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. या गोष्टी फक्त सिनेमापुरत्या मर्यादित नसून जगामध्ये अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. त्यापैकी काही घटना आपण पाहूया.

About some female players who have had to face a sex determination test

प्रतिमा गाओनकर :

२००१ मध्ये झालेल्या ज्युनियर आशियाई अथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये प्रतिमाने रौप्यपदक जिंकले हाेते. हे पदक जिंकल्यानंतर तीन महिन्यांनी तिने आत्महत्या केली होती. याचे कारण असे होते नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स पटियाला येथून तिला सेक्सी डीटर्मिनेशन ची चाचणी करण्यासंदर्भात नोटीस मिळाली होती. यामुळे तिने आपले आयुष्य संपवले होते.

शांती सौंदराजन :

एका दलित कुटुंबात जन्मलेली शांती आशियन गेम्समध्ये पदक मिळवणारी पहिली तमिळ महिला ठरली होती. त्यानंतर सेक्स डिटर्मिनेशन टेस्ट्सच्या रिपोर्टनुसार असे सांगण्यात आले होते की तिच्या मध्ये स्त्री मध्ये असणारी लैंगिक वैशिष्ट्ये यांचा अभाव आहे. यालाच अँड्रोजन इनसेन्सिटिव्हिटी सिंड्रोम असे देखील म्हणण्यात आले होते. 25 वर्षीय शांतीने त्यानंतर आपले आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला होता. पण तिच्या मित्र मैत्रिणींनी तिला यापासून रोखले होते. त्यानंतर तामिळनाडू सरकारने तीला आर्थिक दृष्ट्या सपोर्ट करण्याचे ठरवले. तिला पुडुकोट्टाई येथे ट्रेनर म्हणून नेमण्यात आले होते.

केस्टर सेमेन्या :

वर्ल्ड चॅम्पियनशिप 2009 मध्ये तिने गोल्ड मेडल मिळवले होते. साऊथ अफ्रिकेची ही रनर देखील सेक्स व्हेरिफिकेशनच्या टेस्टला सामोरे गेली होती. या टेस्टचे कोणतेही रिझल्ट ऑफिशिअली जाहीर करण्यात आले नव्हते. तरीही मीडियाने मात्र उलटसुलट चर्चा रंगवल्या होत्या. पण त्याचा कोणताही उपयोग झाला नाही. हे प्रकरण मात्र चांगलेच रंगले होते. त्यानंतर तिने बऱ्याच महिला स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि अवॉर्ड देखील मिळवले होते.

पिंकी प्रामाणिक :

2006 मधील एशियन गेम्समध्ये तिला गोल्ड मेडल मिळाले होते. ही एक ट्रॅक अँड फिल्ड अथलेटिक आहे. पण 2012 मध्ये तिच्या एका मैत्रिणीने तिच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. त्यानंतर आपल्याला ब्लॅकमेल केले जात असल्याचा आरोप पिंकीने देखील केला होता. यानंतर सेक्स डिटर्मिनेशन टेस्टचे आदेश कोर्टाकडून देण्यात आले होते.

परफॉर्मन्स वाढवण्यासाठी कोच च्या सल्ल्यानुसार टेस्टोस्टेरोनचे इंजेक्शन्स घेतले होते असे तिने आपल्या स्टेटमेंटमध्ये सांगितले होते.

हे मॅटर पुढे भलतेच रंगले होते. त्यांच्यानंतर पिंकीला पुरूषांच्या जेलमध्ये ठेवण्यात आले होते. ज्या वेळी पिंकीची सेक्सी डीटर्मिनेशन टेस्ट घेतली होती, त्यावेळी तिला ड्रग्ज देण्यात आले होते आणि ती बेशुद्ध अवस्थेमध्ये होती. असे प्रितीने आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटले होते. पण बऱ्याच वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ती Male pseudo hermaphrodite ची शिकार झाली होती. पुढे 2014 साली तिच्यावर लावण्यात आलेल्या बलात्काराच्या आरोपातून तिची निर्दोष सुटका देखील करण्यात आली होती.

डूट्टे चांद :

भारतीय अथलेटिक्स महासंघाने डूट्टे हिच्यावर ‘हायपरअण्ड्रोजेनिझम’ चा आरोप करत महिला प्लेयर म्हणून खेळण्यास आणि स्पर्धांमध्ये भाग घेण्यास अपात्र ठरवले होते. तसेच 2014 सालच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमधून ही तिला वगळण्यात आले होते. याविरुद्ध तिने कोर्टामध्ये अपील देखील केले होते. स्त्रियांमध्ये टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण जास्त लेव्हलमध्ये असणे ह्याला हायपरअण्ड्रोजेनिझम म्हणु शकत नाही असा कोर्टाच्या आदेशा नंतर तिच्या खेळण्यावर लावण्यात आलेली स्थगिती रद्द केली होती.

About some female players who have had to face a sex determination test

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात