विज्ञानाची गुपिते :अपिवनस्पति म्हणजे काय

स्वसामर्थ्यावर पूर्णपणे न वाढता दुसऱ्याज आधारभूत वनस्पतीवर किंवा क्वचित निर्जीव वस्तूंवर वाढणाऱ्या् पण आपले अन्न-पाणी आश्रय-वनस्पतीच्या शरीरातून न घेता किंवा मुळांद्वारे जमिनीतून न शोषता स्वतंत्रपणे ते मिळवून जीवनक्रम चालविणाऱ्या् वनस्पतीस हे नाव दिले जाते. आपले अन्न व पाणी अंशत: किंवा पूर्णत: दुसऱ्या सजीवांपासून घेऊन त्याला थोडाफार अपाय करणाऱ्याष काही जीवोपजीवी वनस्पती आहेत,What is Apivanspati?

तसेच काही वेली अंशत: इतर वनस्पतींवर आपले ओझे टाकून पण मुळांच्या द्वारे जमिनीतून अंशत: पोषण घेतात, त्याहून अपिवनस्पती भिन्न आहेत. अपिवनस्पती व त्यांची आश्रय-वनस्पती यांचे संबंध ध्यानी घेऊन चार मुख्य प्रकार ओळखले जातात. खऱ्यात अपिवनस्पती विषुववृत्तीय दमट जंगलात यांचे भिन्न प्रकार व जाती आढळतात.

 

कडक हिवाळा किंवा उन्हाळा असलेल्या प्रदेशात यांचे प्रमाण फार कमी; आश्रय-वनस्पतीच्या टोकाशी, मध्यभागी किंवा खालच्या भागावर आढळणाऱ्याण अपिवनस्पतींची संख्या व जाती भिन्न असतात, आडव्या फांद्यांवर त्या अधिक आढळतात, तसेच दमट हवेत निर्जीव वस्तूंचा आधारही काहींना पुरतो. आमरेव अननसाच्या कुलातील बहुतेक जाती, शेवाळी, दगडफुले, नेचे, गवते इत्यादींपैकी काही जाती या गटात येतात. यांच्या बीजांचे व बीजुकांचे प्रसार वारा व पक्ष्यांच्या द्वारे होऊन आश्रय-वनस्पतींच्या पृष्ठावरील खाचांत साचलेल्या धुळीच्या कणांत व कुजकट पदार्थांत त्यांचे अंकुरण होते.

अपिवनस्पतींची काही लहान मुळे किंवा मुलकल्प व मुलब्रुव हे मुळासारखे अवयव त्यांना आश्रयीस चिकटवून ठेवण्याचे काम करतात. तसेच त्यांच्या खाचांतून साचलेल्या मातीतून लवणे व पाणी शोषून घेतात. याशिवाय काही अपिवनस्पतींची लोंबती मुळे त्यांच्या पृष्ठभागावरच्या जलशोषी त्वचेच्या साहाय्याने वातावरणातून पाणी शोषून घेतात व त्यात असलेल्या हरितद्रव्याच्या साहाय्याने प्रकाश संश्लेषण होऊन अन्ननिर्मिती करतात. काही अपिवनस्पतींना वातावरणातून पाणी शोषणारे फक्त केस असतात.

What is Apivanspati?

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub