शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील वाद चिघळण्याची चिन्हे आहेत. आता एका प्रकरणात खासदार संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना वकिलांमार्फत नोटीस पाठवली आहे. माझ्या बदनामीची माफी मागा. अन्यथा मानहानीचे प्रकरण न्यायालयात दाखल करणार, असा इशाराच राऊतांनी दिला आहे. Sanjay Raut warning to Chandrakant Patil To apologize, otherwise he will file a defamation suit
विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील वाद चिघळण्याची चिन्हे आहेत. आता एका प्रकरणात खासदार संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना वकिलांमार्फत नोटीस पाठवली आहे. माझ्या बदनामीची माफी मागा. अन्यथा मानहानीचे प्रकरण न्यायालयात दाखल करणार, असा इशाराच राऊतांनी दिला आहे.
शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’मध्ये प्रकाशित झालेल्या पत्रात चंद्रकांत पाटील यांनी आपल्याबाबत चुकीची माहिती दिल्याचा दावा संजय राऊत यांनी केलाय. पत्नी वर्षा राऊत यांच्या झालेल्या ईडी चौकशीत चंद्रकांत पाटील यांनी आपला चुकीचा संदर्भ जोडल्याचं संजय राऊत यांनी म्हटल आहे. संजय राऊत यांनी आपण चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात सव्वा रुपयाचा दावा दाखल करणार असल्याचं यापूर्वीच जाहीर केलं होतं.
चंद्रकांत पाटील यांनी ‘सामना’ला पत्रं पाठवून शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर आरोप केले होते. राऊत यांनी हे आरोप दळभद्री असल्याचं सांगत चंद्रकांतदादांवर सव्वा रुपयांचा दावा लावणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. चंद्रकांतदादा हे सव्वा रुपयावालेच आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला होता.
संजय राऊतांच्या त्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, राऊत यांनी माझ्यावर सव्वा रुपयांची मानाहानी करणार असल्याचं मी ऐकलंय. ते माझे मित्रं आहेत. त्यामुळे त्यांना मी एकच सूचवेन. त्यांनी मानहानीची किंमत थोडी वाढवावी. कारण राऊतांची मानहानी निश्चितच सव्वा रुपयांची नाही, असा प्रतिटोला त्यांनी लगावला होता. दरम्यान, संजय राऊत यांनी वकिलामार्फत पाठवलेल्या नोटिसीला आता चंद्रकांत पाटील काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App