वृत्तसंस्था
भोपाळ : मध्य प्रदेशातील बसपाच्या आमदार रामबाई सिंह या भ्रष्टाचाराचे खुले आम समर्थन करत असल्याचा एक व्हिडीओ प्रसिद्ध झाल्याने खळबळ उडाली आहे. “पीठामध्ये मीठाएवढा भ्रष्टाचार चालतो”, असे म्हणत अधिकाऱ्यांना भलत्याच शब्दांत रामबाई सिंग या ‘समज’ देत असल्याचे त्यात उघड झाले आहे. “Corruption runs like salt in flour”; Strange argument of BSP MLA Rambai Singh
मध्यप्रदेशातील दामोहच्या सतउआ गावात पंतप्रधान आवास योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. मात्र, या योजनेच्या नावाने अधिकारी लाच मागत आहेत, अशी तक्रार घेऊन ग्रामस्थ रामबाई सिंह यांच्याकडे गेले होते. या तक्रारीनंतर रामबाई सिंह यांनी संबंधित अधिकारी आणि ग्रामस्थांना एकत्र बोलावले. त्यावेळचा हा व्हिडीओ आहे. रामबाई सिंह यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला आहे. मध्य प्रदेशच्या दामोहमधील पथरिया भागाच्या रामबाई सिंह या बसपाच्या आमदार आहेत. नेहमीच अजब विधानांनी त्या चर्चेत असतात.
https://www.youtube.com/watch?v=WnGjOnc5NV4&feature=youtu.be
अधिकाऱ्यांनी ९ हजार रुपयांची लाच घेतल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. पण त्यावरून अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना जाब विचारण्याऐवजी रामबाई सिंह म्हणाल्या, “हे बघा, पीठामध्ये मीठाप्रमाणे (भ्रष्टाचार) चालतो. पण असं नाही की कुणाकडून आख्खं ताटच हिसकून घ्या. मी नाही म्हणत नाही. आम्हालाही माहितीये की अंधेर नगरी चौपट राजा असा प्रकार सुरू आहे. पण एवढा भ्रष्टाचार चांगला नाही”, अशा शब्दांत रामबाई सिंह यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ‘समज’ दिली.
शिवराज जी चुनावी क्षेत्र में रोज कह रहे है कि ना खाऊँगा और ना खाने दूँगा और वही गृह मंत्री नरोत्तम मिश्रा को राखी बांधने वाली बसपा विधायक राम बाई रिश्वत खोरी को लेकर खुलेआम कह रही है कि “ हम भी जानत है कि अंधेर नगरी चौपट राजा चल रहा है “ …..? pic.twitter.com/PVjgvvq9u6
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App