विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन – अमेरिकेचे उप परराष्ट्र मंत्री वेंडी शेरमन या पुढील महिन्यात भारत आणि पाकिस्तानचा दौरा करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यात नुकत्याच झालेल्या थेट चर्चेच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.US minister will visit India, Pakistan
वेंडी शेरमन सहा ऑक्टोबरला नवी दिल्लीत येणार असून याठिकाणी त्या विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेतील. सात ऑक्टोबरला त्या मुंबईमध्ये येणार आहेत. येथे त्या काही उद्योजकांच्या भेटीगाठी घेतील. भारत आणि अमेरिकेतील ‘टू प्लस टू’ चर्चा नोव्हेंबरमध्ये होणार आहे.
त्याचीही पूर्वतयारी शेरमन यांच्या या दौऱ्यावेळी केली जाण्याचा अंदाज आहे. मुंबईहूनच त्या इस्लामाबादला जातील. पाकिस्तानमधील विविध वरीष्ठ अधिकाऱ्यांबरोबर त्या चर्चा करणार आहेत.
अफगाणिस्तानमधील परिस्थितीला अमेरिकाच जबाबदार असल्याची पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांन नुकतीच केलेली टीका, बायडेन यांनी अद्याप इम्रान खान यांच्याशी संपर्क न साधणे या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शेरमन यांच्या दौऱ्याची पाकिस्तानमध्ये उत्सुकता आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App