विशेष प्रतिनिधी
नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील निजामपूर जवळच्या जामदे गावात कीर्तनाच्या व्यासपीठावर ह.भ.प. ताजुद्दिन महाराज शेख यांनी सोमवारी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यावेळी ते कीर्तन सादर करत होते. विशेष म्हणजे ओठी भगवंताचे नाव असताना त्यांनी देहत्याग केला. कीर्तनाच्या व्यसपीठावर एखाद्या कीर्तनकाराने देह ठेवण्याची राज्यातील ही पहिली घटना आहे. Tajuddin Maharaj Sheikh laid down his body during Kirtan; The first incident of death on the stage of kirtan
जामदे गावात ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरु होता. सकाळी पारायणानंतर रोज रात्री विविध कीर्तनकारांचे कीर्तना रंगत असे. सोमवारी रात्री ताजुद्दिन महाराज शेख यांचे कीर्तन सुरु होते.कीर्तन सुरु झाल्यानंतर ताजुद्दीन महाराज यांना अवघ्या ४५ मिनिटात त्रास जाणवू लागला. ते छातीत कळा आल्याने खाली बसले. यावेळी ग्रामस्थांनी पाण्याची व्यवस्था केली. त्यांना डॉक्टरांकडे हलवण्यात आले. तो पर्यत त्यांची प्राणज्योत मालावल्याचे डॉक्टरांनी सांगितले. एका नामवंत कीर्तनकारांचा कीर्तनाच्या व्यासपीठावर झालेला शेवट हा चर्चेचा विषय ठरला आहे.
क्रांतिकारी कीर्तनकार म्हणून ख्याती
एक क्रांतिकारी कीर्तनकार म्हणून ख्याती असलेले ताजुद्दिन महाराज हे मुस्लिम समाजाचे असले तरी वारकरी संप्रदायाची जीवनशैली त्यांनी अंगिकारली होती. महाराज नित्य हरिपाठ, भजन-कीर्तन करायचे. त्यांनी आतापर्यंत प्रत्येक वारीला हजेरी लावली आहे. त्यांच्या मृत्यूने वारकरी संप्रदायात हळहळ व्यक्त केली जात आहे.
ते मूळचे जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील जांब समर्थजवळील बोधलापुरी गावचे रहिवाशी होते. गावासह पैठणमध्येही त्यांनी एक आश्रम काढून त्यातून वारकरी सांप्रदायाचा प्रसार-प्रचाराचे काम केले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App