कन्हैया कुमार आज काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. यादरम्यान महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालात कन्हैया कुमारने स्वत: बसवलेला एसी आता काढून घेतला आहे. कम्युनिस्ट पक्ष सोडत असतानाच कन्हैय्याने स्वत: दिलेला एसी काढून घेतल्याने सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. Kanhaiya Kumar takes away air conditioner from CPI office
विशेष प्रतिनिधी
पाटणा : कन्हैया कुमार आज काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. यादरम्यान महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालात कन्हैया कुमारने स्वत: बसवलेला एसी आता काढून घेतला आहे. कम्युनिस्ट पक्ष सोडत असतानाच कन्हैय्याने स्वत: दिलेला एसी काढून घेतल्याने सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.
कन्हैयाने सीपीआय सोडल्याच्या चर्चा बऱ्याच काळापासून रंगल्या होत्या. आता त्यांनी पक्ष कार्यालयातून एसी काढल्याच्या बातम्यांनी यावर शिक्कामोर्तब केले आहे. सीपीआयचे राज्य सचिव रामनरेश पांडे यांनी सांगितले की, कन्हैयाने काही दिवसांपूर्वी कार्यालयात बसवलेला एसी काढला आहे.
ते म्हणाले की, मी हे मान्य केले, कारण कन्हैयाने स्वतःच्या पैशाने हा एसी बसवला होता. मला आशा आहे की, कन्हैया कुमारने काँग्रेसमध्ये सामील होण्याचा निर्णय मागे घ्यावा, असेही ते म्हणाले.
पांडे पुढे म्हणाले की, मला आशा आहे की कन्हैया कुमार काँग्रेसमध्ये सामील होणार नाही, कारण त्यांची मानसिकता साम्यवादी आहे आणि असे लोक त्यांच्या विचारधारेवर कठोर आहेत.
पांडे पुढे म्हणाले की, कन्हैया कुमार राष्ट्रीय राजधानीत 4 आणि 5 सप्टेंबर रोजी सीपीआयच्या राष्ट्रीय कार्यकारी परिषदेच्या बैठकीला उपस्थित होता. या बैठकीत त्याने पक्ष सोडण्याचा कोणताही इरादा स्पष्ट केला नाही किंवा पक्षात कोणत्याही विशेष पदाची मागणी केली नाही.
जेएनयू विद्यार्थी युनियनचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार आणि गुजरातमधील राष्ट्रीय दलित अधिकार मंच (आरडीएएम) चे आमदार जिग्नेश मेवानी 28 सप्टेंबर रोजी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Kanhaiya Kumar takes away air conditioner from CPI office
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App