
Chip Manufacturing Plant in India : संपूर्ण जग सेमीकंडक्टर चिपच्या तुटवड्याला सामोरे जात आहे. यामुळे जगभरातील तसेच भारतातील कार, मोबाईल फोन आणि इतर तंत्रज्ञान उत्पादनांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. या समस्येवर मात करण्यासाठी भारत आता तैवानसोबत मेगा डील करण्याची तयारी करत आहे. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, भारत आणि तैवानच्या अधिकाऱ्यांनी नजीकच्या आठवड्यांमध्ये 7.5 अब्ज डॉलर्सच्या खर्चाने भारतात चिप प्लांट उभारण्याच्या करारावर चर्चा करण्यासाठी भेट घेतली आहे. ज्यामध्ये 5G उपकरणांपासून इलेक्ट्रिक कारसाठी पुरवठ्यापर्यंत समावेश आहे. Chip Manufacturing Plant in India Taiwan May Ink Mega Deal to Set Up 7 5 billion dollar project
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : संपूर्ण जग सेमीकंडक्टर चिपच्या तुटवड्याला सामोरे जात आहे. यामुळे जगभरातील तसेच भारतातील कार, मोबाईल फोन आणि इतर तंत्रज्ञान उत्पादनांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. या समस्येवर मात करण्यासाठी भारत आता तैवानसोबत मेगा डील करण्याची तयारी करत आहे. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, भारत आणि तैवानच्या अधिकाऱ्यांनी नजीकच्या आठवड्यांमध्ये 7.5 अब्ज डॉलर्सच्या खर्चाने भारतात चिप प्लांट उभारण्याच्या करारावर चर्चा करण्यासाठी भेट घेतली आहे. ज्यामध्ये 5G उपकरणांपासून इलेक्ट्रिक कारसाठी पुरवठ्यापर्यंत समावेश आहे.
सेमीकंडक्टर चिप्सच्या जागतिक तुटवड्यामुळे अनेक देश आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांना चिंताग्रस्त केले आहे, कारण यामुळे उत्पादन आणि विक्रीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. तूर्तास त्यावर कोणताही उपाय दिसत नाही. सेमीकंडक्टर चिप मार्केटमध्ये तैवानचा मोठा वाटा आहे. सिलिकॉनपासून बनवलेल्या या चिप्स संगणक, लॅपटॉप, टीव्ही, स्मार्टफोन, कार, फ्रिज तसेच घरातील अनेक उपकरणांमध्ये वापरल्या जातात.
या छोट्या आकाराच्या चिप्स डेटा ट्रान्सफर आणि पॉवर डिस्प्लेसारख्या कोणत्याही उपकरणाच्या संचालनासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. चिप्सच्या तुटवड्यामुळे कार, फ्रिज, लॅपटॉप, टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या विक्रीवरही परिणाम झाला. या चिप्सचे उत्पादन वाढवणे अल्पकाळात शक्य नाही. या चिप्सची निर्मिती ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, यात काही महिने लागू शकतात.
ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन (टीएसएमसी) ही जगातील सर्वात मोठी चिप उत्पादक आहे. त्याच्या ग्राहकांमध्ये क्वालकॉम, एनव्हिडिया आणि अॅपलसारख्या कंपन्यांचा समावेश आहे. चिप निर्मितीमध्ये त्यांचा वाटा 56 टक्के आहे. कोविड महामारीदरम्यान इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या विक्रीत वाढ झाल्यामुळे सेमीकंडक्टरची मागणी लक्षणीय वाढली. परंतु केवळ कोविड -19 हे त्याच्या अभावाचे कारण नाही.
तुटवड्यासाठी अमेरिका आणि चीनमधील तणावही कारणीभूत
अमेरिका आणि चीन यांच्यातील तणाव हादेखील या तुटवड्यामागील एक मोठा घटक आहे. अनेक अमेरिकन कंपन्या चिनी कंपन्यांसोबत व्यवसाय करतात. उदाहरणार्थ, अमेरिकन चिप निर्मात्यांना पुरवठा करणारी Huawei ही कंपनी अमेरिकन सरकारने काळ्या यादीत टाकली आहे. त्यामुळे आता मागणी पूर्ण होण्यास बराच वेळ लागू शकतो.
Chip Manufacturing Plant in India Taiwan May Ink Mega Deal to Set Up 7 5 billion dollar project
महत्त्वाच्या बातम्या
- ‘गुलाब’ चक्रीवादळामुळे आज आणि उद्या महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा, 11 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी
- भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाचे हंगामातील पहिले जेतेपद, Ostrava Open मध्ये चीनच्या झांगसह डबल्स चॅम्पियन
- राजस्थानात हायटेक चिटिंगचा प्रकार उघड, चपलेत बसवले गॅजेट, 25 परीक्षार्थींना दीड कोटीत झाली विक्री, कॉपी बहाद्दरांसह टोळी गजाआड
- सुप्रीम कोर्टाने NEET SS एक्झाम पॅटर्नमध्ये बदल केल्यावरून केंद्र, NBE आणि वैद्यकीय परिषदेला फटकारले
- Bhawanipur By-polls : बंगालमध्ये तृणमूलचा पुन्हा हिंसाचार, भवानीपूरमध्ये भाजचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष यांच्यावर तृणमूलच्या गुंडांचा हल्ला