वृत्तसंस्था
नवी दिल्ली – प्रसिद्ध महिला हक्क कार्यकर्त्या आणि लेखिका कमला भसीन (वय ७५) यांचे निधन झाले. ग्रामीण आणि आदिवासी महिलांच्या सक्षमीकरणामध्ये त्यांचे मोठे योगदान होते. Activist Kamala Bhasin no more
भसीन यांचा जन्म २४ एप्रिल १९४६ मध्ये मंडी बहाउद्दीन येथे झाला. हे शहर सध्या पाकिस्तानात आहे. फाळणीनंतर भसीन कुटुंबीय भारतात राजस्थानमध्ये स्थायिक झाले. भसीन यांनी राजस्थानमध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर जर्मनीमध्ये समाजशास्त्राचे उच्चशिक्षण घेतले.
‘या शिक्षणानंतर कमला भारतात परतल्या आणि त्यांनी उदयपूरमधील ‘सेवा मंदिर’या स्वयंसेवी संस्थेसोबत काम करायला सुरूवात केली होती. पुढे २००२ मध्ये त्यांनी ‘संगत’ या संस्थेची स्थापना केली. ही संस्था महिला ग्रामीण आणि आदिवासी महिलांसाठी काम करते. मध्यंतरी देशभर गाजलेली ‘आझादी’ची घोषणा ही सर्वप्रथम भसीन यांच्यामुळेच चर्चेत आली होती. प्रचलित पितृसत्ताक व्यवस्थेला आव्हान देण्यासाठी त्यांनी या शब्दाचा वापर केला होता.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App