यशस्वी जीवनाचे मूळ सूत्र हे वेळेच्या व्यवस्थापनात दडलेले आहे. जीवनातील एकही क्षण व्यर्थ घालवता कामा नये. शक्य तितक्या प्रत्येक मिनिटाचा, क्षणाचा आपल्या आयुष्यात वापर करायला हवा. प्रत्येक माणसाला वेळेची किंमत असायला हवी. वेळेची किंमत आणि महत्त्व जाणून जो माणूस व्यवस्थापन करून जीवन जगत असतो. त्याला कधीही अपयशाला सामोरे जावे लागत नाही. वेळेचे व्यवस्थापन करून ते आचरणात आणल्यास हाती घेतलेल्या कामात यश मिळणे सुलभ होते. Life Skills: If you want to succeed in life, manage your time well
जागतिक स्तरावर अशी अनेक उदाहरणे पाहायला मिळतील, ज्यातून वेळेची किंमत आणि वेळेच्या योग्य व्यवस्थापनामुळे माणसे यशाच्या शिखरावर पोहोचली आहेत. किंबहुना जगातील दिग्गज व्यक्तींनी आपल्या आयुष्यातील वेळेला महत्त्व देत प्रत्येक क्षणाचा उपयोग केल्याचेच आपल्याला दिसते. वेळेच्या व्यवस्थापनात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतच्या कालावधीचे नियोजन केले जाते. वेळच मिळत नाही, असा शब्दप्रयोग आपण शेकडो वेळा करतो आणि समोरच्या व्यक्तीने केलेला पाहतो. वास्तविक पाहता, खरेच आपल्याला वेळ मिळत नाही का? आपल्या प्रियजनांना भेटायला, त्यांच्या गप्पा मारायला आपण वेळ काढतोच.
आपण कशा प्रकारे वेळेचा उपयोग करायचा, हे आपल्या हातात आहे. अन्यथा आपण विनाकारण व्यस्त राहतो आणि आपले जीवन भरकटते. आजच्या काळातील माणसाची दिनचर्या अशी बनली आहे, ज्यामुळे पहाटे पाचलाही उठणे शक्य होत नाही. कारण व्यग्र दिनचर्येमुळे माणसाला झोपण्यासाठीच मध्यरात्रीचे एक वाजतात. माणसाची जेवणाची वेळही रात्री अकरावर गेली आहे. त्यामुळे पहाटे उठण्याची संकल्पनाच लोप पावत चालल्यासारखे दिसतेय. माणसाची आजची जीवनशैलीच पूर्णपणे बदलून गेली आहे. उठण्याची वेळ, कामाची वेळ, जेवणाच्या वेळा आणि झोपण्याची वेळ या गोष्टी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात. दररोजचे काम सुलभ व्हावे, असे वाटत असल्यास या कामाचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे ठरते. कामानंतर आराम आणि आरामानंतर पुन्हा काम असे सूत्र आचरल्यास जीवन मजेशीर होईल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App