प्रख्यात लेखीका रॅनडा बर्न तीच्या द सिक्रेट या पुस्तकात पैश्यांविषयी लिहिते. पैश्यांच्या बाबतीतही सकारात्मक असाल, तरच पैश्यांचा ओघ तुमच्याकडे येईल. प्रत्येक नकारात्मक विचार, भावना, भावस्थिती ही चांगल्या गोष्टी जीवनात येण्यास प्रतिबंध करते आणि यात पैसाही अंतर्भूत आहे असे तिचे ठाम मत आहे.Money will come to you only if you think positively about money
आपण जेव्हा तंगीत किंवा संकटात असतो त्यावेळी पैशांची उणीव किंवा तुटवडा या विषयी विचार करण्यापेक्षा आपण समृद्ध झालो तर काय काय करणार आहोत याचा विचार करायला हवा. खरेत तर ते सोप काम नाही. पण प्रयत्न केल्यास अगदी अशक्यदेखील नाही. अशा वेळी समृद्धीचा विचार करा.
त्या दिशेने पावलं टाकायला सुरुवात करा. म्हणजेच आपल्या हातून काम घडते आणि त्याचा परिणाम पैश्यांच्या प्राप्तीवर सुद्धा होतो. अजून एक गोष्ट म्हणजे पैसा किंवा तुम्हाला कोणतीही आवश्यक वाटेल ती बाब मिळण्याचा एक शार्ट कट म्हणजे आनंदीत रहा. सुख अनुभवा. मनासारख्या वस्तू वा पैसा जीवनात आणण्यासाठीचा मार्गच हा आहे.
तुम्ही आनंद आणि सुख या भावना तुमच्या आसपास पसरवा म्हणजे त्याच तुमच्याकडेही आकर्षित होतील. तुमच्या आयुष्यात पैसा आणि सुख आणतील. तुमचे आंतरीक विचार सर समृध्द , सुविचार असतील तर तशीच तुमचीही भरभराट होईल हे नक्की.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App