वृत्तसंस्था
सातारा : सातारा जिल्ह्यातील जवानाला लडाखमध्ये वीरमरण आले आहे. त्यामुळे वाई तालुक्यातील आसले गावावर शोककळा पसरली आहे. Satara’s son dies in Ladakh, mourning in the Aasale village
सोमनाथ मांढरे, असे त्यांचे नाव आहे. शुक्रवारी पहाटे लडाखमधील बर्फाच्छादित प्रदेशात ते कर्तव्यावर होते. अचानक त्यांना श्वासोच्छवास घेण्यास त्रास होऊ लागला. ते बेशुद्ध झाले. त्यांना लष्करी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
लष्कराकडून वाईचे तहसीलदार रणजीत भोसले यांना ही माहिती मिळाली. त्यांनी आसले (ता. वाई) येथील त्यांचे बंधू महेश मांढरे यांना ही घटना कळवली. जवान सोमनाथ मांढरे यांचे पार्थिव आज पहाटे दिल्लीत पोचेल. त्यानंतर, सायंकाळपर्यंत आसले या मूळ गावी पोचेल व त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत
दरम्यान, सोमनाथ मांढरे यांच्या निधनामुळे आसले गावावर शोककळा पसरली आहे. कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मांढरे यांच्या पश्चात पत्नी, आठ वर्षांचा मुलगा, दहा महिन्यांची मुलगी व लहान भाऊ आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App