PM MODI BIRTHDAY:पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त संभाजीनगर भाजपचं ‘सेवा व समर्पण’अभियान !

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७१व्या वाढदिवसानिमित्त संभाजीनगरमध्ये नारी शक्तीच्या सबलीकरणाचे प्रतीक असलेल्या उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांचा सन्मान .

  • संभाजीनगरमध्ये रक्तदान, गरीब कल्याणच्या लाभार्थ्यांना सहाय्य अशा कार्यक्रमांनी सेवा-समर्पण दिन साजरा .

विशेष प्रतिनिधी

संभाजीनगर : सेवा व समर्पण अभियानानिमित्त भाजप तर्फे महाराष्ट्रभर जनकल्याणकारी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते . प्रदेश कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यावर आधारीत छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उदघाटन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.तर संभाजीनगर येथे रक्तदान, गरीब कल्याणच्या लाभार्थ्यांना सहाय्य अशा कार्यक्रमांनी सेवा-समर्पण दिन साजरा करण्यात आला .PM MODI BIRTHDAY: Sambhajinagar BJP’s ‘Service and Dedication’ campaign on the occasion of PM Modi’s birthday!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७१व्या वाढदिवसानिमित्त संभाजीनगरमध्ये नारी शक्तीच्या सबलीकरणाचे प्रतीक असलेल्या उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांचा सन्मान भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांच्या हस्ते करण्यात आला.

गरजूंना धान्य वाटप, रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी शिबीर, केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभार्थ्यांशी संपर्क अशा विविध उपक्रमांनी भारतीय जनता पार्टीच्या सेवा व समर्पण अभियानाला राज्यात प्रारंभ करण्यात आला.

अभियानानिमित्त भाजपा प्रदेश कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यावर आधारीत छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उदघाटन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले .

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक कल्याणकारी योजनांची प्रभावी पद्धतीने अंमलबजावणी करून गरीब कल्याणाचा संकल्प प्रत्यक्षात आणला आहे.

नाशिक, नागपूर, मुंबईत विविध उपक्रम

औरंगाबाद येथे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते बियाणांचे वितरण करण्यात आले. नाशिक येथे नवजात बालकांपासून ते 18 वर्ष वयापर्यंतच्या लाभार्थीसाठी आरोग्य तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यावेळी उपस्थित होत्या. नागपूर येथे महानगर अध्यक्ष आमदार प्रवीण दटके, आमदार मोहन मते यांच्या उपस्थितीत गरजूंना अन्नधान्याचे वितरण करण्यात आले. मुंबईत माटुंगा येथील डेविड ससून चिल्ड्रेन स्कूलमधील मुलांसाठी मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते.

पुण्यात केंद्राच्या 52 योजनांबाबत प्रबोधन

पुणे शहरात पंतप्रधान आवास योजना, उज्वला गॅस योजना, आयुष्यमान भारत योजना इत्यादी सुमारे 52 योजनांचा लाभ सामान्य नागरिकांना घेता यावा यासाठी प्रबोधन केले जाणार आहे. त्याचा प्रारंभ खा. गिरीश बापट यांच्या हस्ते झाला. 1 कार्यकर्ता 25 लाभार्थी हे अभियान संपूर्ण पुणे शहरात राबविण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे व त्यांच्या लोकसेवक कारकीर्दीला 20 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. 7 ऑक्टोबरपर्यंत हे अभियान चालणार आहे.

भाजपचं ‘सेवा आणि समर्पण अभियान’

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी अलिकडेच एका बैठकीत हे अभियान कसं असेल हे सांगितलं होतं. त्यातले प्रमुख मुद्दे असे-

1.पंतप्रधान मोदींचा फोटो असलेल्या 14 कोटी राशन बॅग वाटण्यात येतील. यात पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत 5 किलो राशन ह्या बॅगेत असेल. विशेष म्हणजे भाजपशासित राज्यात आतापर्यंत 2.16 कोटी बॅग वाटण्यात आल्यात.

2. कोरोना महामारीच्या काळात मोदींची मदत झाली, त्यामुळे त्यांना धन्यवाद देणारे व्हिडीओ दाखवले जाणार. यात गरीबांचे मसिहा मोदीजी असा संदेश असेल.

3. देशभरातून बूथ लेवलवरुन थँक्यू मोदीजी असं लिहिलेलं 5 कोटी पोस्टकार्ड त्यांना पाठवले जातील.

4. मोदींचा हा 71 वाढदिवस आहे, त्यामुळे 71 ठिकाणी नद्यांची साफसफाई अभियान राबवलं जाईल.

5. ज्यांना कोरोनाची लस दिली गेलीय, त्यांनी थॅक्यू मोदीजी म्हटलेले व्हिडीओ प्रसारीत केले जातील.

6.मोदींच्या राजकीय प्रवासावर व्हिडीओ दाखवला जाईल. राज्य आणि जिल्हा स्तरावर मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जाईल. सेमिनारही असतील.

7. प्रसिद्ध लेखक, कवी यांच्याकडून मोदींची स्तुती करणारं साहित्य उपलब्ध केलं जाईल. यात प्रादेशिक भाषेतले लेखकही असतील.

8. कोरोनाकाळात जी मुलं अनाथ झालीत, त्यांना पीएम केअर फंडातून मदत देण्यासाठी नोंदणी अभियान चालवलं जाईल.

9. पंतप्रधान मोदींना अनेक सन्मानचिन्हं आणि प्रतिमा मिळालेल्या आहेत, त्याच्या निलामीबद्दल लोकांना सांगितलं जाईल.

10. वृद्धांना भोजन वाटप, त्यांच्या प्रकृतीची मोफत तपासणी, ब्लड डोनेशन कँप याचेही आयोजन केलं जाईल.

11. 2 ऑक्टोबरला गांधी जयंती तर 25 सप्टेंबरला दीनदयाल उपाध्याय जयंती आहे. भाजप कार्यकर्त्यांना बूथ लेव्हलवर ह्या दोन दिवशी रचनात्मक कार्य करायला सांगितलं जाईल.

 

PM MODI BIRTHDAY: Sambhajinagar BJP’s ‘Service and Dedication’ campaign on the occasion of PM Modi’s birthday!

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात