वृत्तसंस्था
काबूल : मंत्रिमंडळाची घोषणा झाल्यापासून तालिबानमध्ये परिस्थितीनुसार बदल करण्यास तयार असलेले नेते आणि जुन्याच विचारांचा आधार घेणारे नेते, यांच्यात असलेला वाद अधिक तीव्र झाला आहे. तालिबानमध्ये कट्टरतावाद्यांचा वरचष्मा निर्माण झाल्याचे आणखी एक उदाहरण म्हणजे अध्यक्षीय प्रासादावर अफगाणिस्तानच्या झेंड्याऐवजी तालिबानचा झेंडा फडकवला जात आहे. Quaral between Taliban fraction in Afganistan
तालिबान संघटनेतील वाद अद्याप तरी पडद्यामागेच असले तरी वादाच्या काही घटनांची माहिती आणि काही अफवा वेगाने सर्वत्र पसरत आहेत. गेल्या आठवड्यात अध्यक्षीय प्रासादातच दोन गटांमध्ये हाणामारी होऊन त्यात तालिबानचा प्रमुख म्होरक्या आणि सध्याचा उपपंतप्रधान अब्दुल घनी बरादर याचा मृत्यू झाल्याची अफवा पसरली होती.
ही अफवा इतक्या वेगाने पसरली की, तालिबानी प्रवक्त्याने त्याचे खंडन करूनही नंतर स्वत: बरादर याला आधी लेखी निवेदन आणि नंतर ध्वनिफित प्रसिद्ध करत आपण जिवंतच असल्याचे स्पष्ट करावे लागले होते. दुसऱ्या दिवशी तो राष्ट्रीय वाहिनीवरही दिसला होता. बरादर हा तालिबानमधील मवाळ गटाचा नेता मानला जातो.
तालिबान आणि अमेरिका यांच्यादरम्यान झालेल्या चर्चेत बरादर याची महत्त्वाची भूमिका होती. अमेरिकेचा सैन्यमाघारीचा निर्णय ही या चर्चेचीच फलनिष्पत्ती मानली जाते. काबूलचा पाडाव झाल्यानंतरही बरादर याने सर्वसमावेशक सरकार स्थापन करणार असल्याचे म्हटले होते. मात्र, प्रत्यक्षात जाहीर झालेल्या हंगामी मंत्रिमंडळात फक्त पुरुषच आणि त्यातही फक्त तालिबानी नेत्यांचाच समावेश करण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App