Gujarat Cabinet Expansion : विजय रूपाणी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर गुजरातेत अख्खे मंत्रिमंडळच बदलण्यात आले आहे. नवे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळात सर्व नव्यांना संधी देण्यात आली आहे. या नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी गुरुवारी झाला. यादरम्यान पाच आमदारांनी एकत्र मंत्री म्हणून शपथ घेतली. यामध्ये राजेंद्र त्रिवेदी यांचा समावेश आहे, ज्यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. Gujarat Cabinet Expansion New Gujarat Ministers Swearing in ceremony today
विशेष प्रतिनिधी
अहमदाबाद : विजय रूपाणी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर गुजरातेत अख्खे मंत्रिमंडळच बदलण्यात आले आहे. नवे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळात सर्व नव्यांना संधी देण्यात आली आहे. या नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी गुरुवारी झाला. यादरम्यान पाच आमदारांनी एकत्र मंत्री म्हणून शपथ घेतली. यामध्ये राजेंद्र त्रिवेदी यांचा समावेश आहे, ज्यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
Gujarat: Swearing-in ceremony of the new Council of Ministers is underway at Raj Bhavan in Gandhinagar, in the presence of Governor Acharya Devvrat. Chief Minister Bhupendra Patel was sworn in earlier this week pic.twitter.com/FfenGTzOaW — ANI (@ANI) September 16, 2021
Gujarat: Swearing-in ceremony of the new Council of Ministers is underway at Raj Bhavan in Gandhinagar, in the presence of Governor Acharya Devvrat. Chief Minister Bhupendra Patel was sworn in earlier this week pic.twitter.com/FfenGTzOaW
— ANI (@ANI) September 16, 2021
सर्व नव्या चेहऱ्यांना नव्या मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. यामध्ये राघव पटेल, जितू वाघानी, पूर्णेश मोदी, नरेश भाई पटेल, अर्जुन सिंह चव्हाण, हृषिकेश पटेल, कनुभाई देसाई, किरीट सिंह राणा, प्रदीप सिंह परमार, मनीषा वकील, हर्ष संघवी, ब्रिजेश मेर्जा, जगदीश भाई पांचाळ, जितू भाई चौधरी यांचा समावेश आहे. समाविष्ट आहे. 24 मंत्र्यांची शपथ घेतली जात आहे. यामध्ये 9 कॅबिनेट आणि 15 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.
यापूर्वी हा शपथविधी सोहळा 15 सप्टेंबरला होणार होता. यासंदर्भात राजभवनात पोस्टरही लावण्यात आले होते. नंतर ती सर्व पोस्टर्स पुन्हा काढण्यात आली. भूपेंद्र पटेल यांनी सोमवारी नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती.
मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाची पहिली मंत्रिमंडळ बैठक आज दुपारी 4.30 वाजता गांधीनगरमध्ये होणार आहे. गुजरातच्या मुख्यमंत्री कार्यालयाने ही माहिती दिली.
Gujarat Cabinet Expansion New Gujarat Ministers Swearing in ceremony today
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App