तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांना पुन्हा ईडीचे समन्स

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांना सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) तिसऱ्यांदा समन्स पाठविले आहे. ED once again summonsed MP Abhishek Banerjee

कोळसा गैरव्यवहारात चौकशीसाठी त्यांना ता. २१ रोजी दिल्लीत चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितले आहे. यापूर्वी गेल्या सोमवारी ईडीने त्यांची चौकशी केली होती. या प्रकरणी अभिषेक यांची पत्नी रुचिरा यांनाही चौकशीसाठी बोलाविण्याची शक्यता आहे.



नुकत्याच झालेल्या प. बंगालच्या विधानसभा निवडणुकीतही हा चौकशीचा मुद्दा गाजला होता. केंद्र सरकार राजकीय हेतूने अशा प्रकारे कारवाई करीत असल्याची टीका तृणमुल कॉंग्रेसच्या नेत्यांनी पुन्हा केली आहे. निवडणुकांच्या काळातही बॅनर्जी यांच्या पत्नीला चौकशीसाठी पाचारण करण्यात आले होते.

ED once again summonsed MP Abhishek Banerjee

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात