विशेष प्रतिनिधी
काबूल – अफगाण महिलांनी मंत्रिमंडळात सहभागी व्हावे,’ असे आवाहन तालिबानी नेत्यांनी केले होते. पण नवे सरकार जाहीर करताना त्यांनी मंत्रिमंडळात एकाही महिलेचा समावेश केलेला नाही, याबद्दल तेथील ‘टोलो न्यूज’या वृत्तवाहिनीशी बोलताना तालिबानचा प्रवक्ता हाश्मीबने पुराणमतवादी सूर आळवला. ‘‘महिला मंत्री बनू शकत नाही. Taliban opposes women participation in Govt.
त्यांना मंत्रिपद देणे म्हणजे तिला पेलणार नाही, असे ओझे तिच्या खांद्यावर लादल्यासारखे होईल. महिलांनी मंत्रिमंडळात सहभागी होणे आवश्याक नाही, त्यांनी मुले जन्माला घालावीत,’’ असे तो म्हणाला. महिला आंदोलक या संपूर्ण अफगाणिस्तानमधील महिलांचे प्रतिनिधित्व करू शकत नाही, असेही हाश्मीप सांगितले.
वेश्याहव्यवसायासाठी सर्व महिलांना तुम्ही दोष देऊ शकत नाही, असे मुलाखतकाराने हटकले असता, ‘माझा रोख सर्व अफगाणी महिलांकडे नसून, रस्त्याावर आंदोलन करणाऱ्या चार महिलांकडे आहे. त्या अफगाणिस्तानमधील महिलांचे प्रतिनिधित्व करू शकत नाहीत. ज्यांनी अफगाणिस्तानच्या लोकांना जन्म दिला आणि इस्लामी रिती-रिवाजांचे शिक्षण दिले, त्यात खऱ्या अफगाणिस्तानच्या महिला आहेत,’ असा अजब तर्क हाश्मी ने सांगितला.
महिला मंत्री का बनू शकत नाही, या प्रश्ना्वर उत्तर देताना स्त्री काय शकते, ती मंत्रालयाची कामे करू शकत नाही. तिला पेलणार नाही, असे ओझे तुम्ही तिच्या खांद्यावर टाकत आहात, असे हाश्मील म्हणाला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App