विशेष प्रतिनिधी
पुणे : समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्या नावाचा संदर्भ देऊन इतर महिलांच्या बाबतीत बदनामीकारक फोटो टाकून व प्रक्षोभक वक्तव्याची पोस्ट करुन त्यांची बदनामी करणाऱ्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतही आक्षेपार्ह मजकूर अपलोड केला आहे.Filed a case of posting offensive text about political leaders
राहुल मुळे असे गुन्हा दाखल झालेंक्या फेसबुक युजरचे नाव आहे. याप्रकारणी ज्ञानेश्वर बडे (वय २८, रा. द्वारका अपार्टमेंट, मॉडेल कॉलनी) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार १९ एप्रिल २०२१ पासून सुरु होता. राहुल मुळे नावाने असलेल्या फेसबुक अकाऊंटवर अश्लिल व घाणेरड्या भाषेमध्ये पोस्ट करण्यात आल्या. त्याच्या पोस्टला रिप्लाय देणाऱ्या लोकांना प्राण्यांच्या पार्श्वभागाचे फोटो टाकून अश्लिल व घाणेरड्या भाषेमध्ये रिप्लाय दिला आहे.
यासोबतच मराठा समाजाच्या भावना दुखावल्या जाऊन दोन समाजामध्ये द्वेषची भावना निर्माण होईल, अशा पोस्ट देखील त्याने केल्या आहेत.मंत्री धनंजय मुंडे व करुणा शर्मा यांच्या नावाचा संदर्भ देऊन इतर महिलांच्या बाबतीत बदनामीकारक फोटो देखील त्याने।अपलोड केले होते. प्रक्षोभक वक्तव्याची पोस्ट टाकून त्यांची बदनामी करण्यात आल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड, अनिल देशमुख, संजय राऊत, अमृता फडणवीस, अमोल मिटकरी, रोहित पवार यांच्याविषयी बदनामीकारक पोस्ट करुन कमेंटमध्ये बदनामीकारक पोस्ट केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App