वृत्तसंस्था
नवी दिल्ली : आज सकाळी काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी जय मातादी म्हणत जम्मूत काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित केले, तर सायंकाळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गणपती बाप्पा मोरया म्हणत दिल्लीच्या यमुना किनारी गणेश पूजन केले. भाजपच्या हिंदुत्वाच्या नावाने खडे फोडणारे हे दोन्ही नेते अखेर हिंदुत्वाचाच रंगात रंगलेले दिसले. CM Arvind Kejriwal and his wife Sunita Kejriwal participate in the ‘Ganesh Pujan’ programme organised by Delhi Government.
सकाळी जम्मू मध्ये राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भाषणाची सुरुवात जय मातादी या जयघोषाने केली. त्यावेळी त्यांनी जम्मू-काश्मीरच्या बहु मिश्र संस्कृती वरून संघ परिवाराला ठोकून घेतले. काल त्यांनी माता वैष्णो देवीचे 14 किलोमीटर चालत जाऊन दर्शन घेतले होते.
Delhi: CM Arvind Kejriwal and his wife Sunita Kejriwal participate in the 'Ganesh Pujan' programme organised by Delhi Government. #GaneshChaturthi pic.twitter.com/RrCrbJS01v — ANI (@ANI) September 10, 2021
Delhi: CM Arvind Kejriwal and his wife Sunita Kejriwal participate in the 'Ganesh Pujan' programme organised by Delhi Government. #GaneshChaturthi pic.twitter.com/RrCrbJS01v
— ANI (@ANI) September 10, 2021
आज सकाळी सायंकाळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सपत्नीक गणेश पूजन केले. सिग्नेचर पुलाजवळ यमुनेच्या किनारी उभारलेल्या सरकारी मंडपात त्यांनी गणेशाची प्रतिष्ठापना केली. दिल्लीत सार्वजनिक मंडपात गणेश प्रतिमा स्थापन करायला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांनी आपल्या मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांसह सर्व दिल्लीकरांच्या वतीने एकाच ठिकाणी गणेश प्रतिष्ठापना केली.
आजच्या गणेश चतुर्थीच्या निमित्ताने राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांनी हिंदू समाजाला चुचकारून घेण्याचा प्रयत्न केला. हे दोन नेते भाजपच्या कुठल्याही धार्मिक कार्यक्रमावर टीकाटिपणी करत असतात. पण आज जय माता दी आणि गणपती बाप्पा मोरया म्हणत राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल हेच हिंदुत्वाचा रंगात रंगलेले दिसले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App