विशेष प्रतिनिधी
कोट्टायम : केरळमधील ख्रिश्चन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून कट्टरतावादी लव्ह जिहादच्या माध्यमातून युवा पिढीला उध्वस्त करण्याचे काम करत असल्याचा आरोप कॅथॉलिक बिशप जोसेफ कल्लारंगट यांनी केला आहे. कट्टरवादी जिथे शस्त्रांचा वापर करू शकत नाहीत, तिथे लव्ह आणि अमली पदार्थ जिहाद सारख्या प्रकारांचा वापर करून अन्य धमार्तील युवा पिढीला उद्ध्वस्त करण्याचे काम करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.Kerala bishop accuses fanatics of love jihad by trapping Christian girls
कुरुविलांगड येथे चर्चमध्ये आयोेजित कार्यक्रमात बिशप म्हणाले की, लव्ह जिहादच्या नावाखाली मुस्लिमेतर मुली विशेषत: ख्रिश्चन समुदायाच्या मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे शोषण करण्यात येते. त्यांचा वापर दहशतवादासारख्या हिंसक आणि विघातक कायार्साठी केला जातो. जगात अनेक ठिकाणी हे प्रकार घडताहेत आणि केरळमध्येही असे प्रकार लक्षात आले आहेत.
त्यामुळे तरुणींनी याबाबत सतर्क राहायला हवे. प्रेमात आंधळे होऊन नको ते निर्णय घेण्याआधी तरुणींनी विचार करायला हवा. आपला कोणी गैरवापर, तर करत नाही ना, हे पाहायला हवे.भारतासारह्यया लोकशाहीप्रधान देशात शस्त्रास्त्रे प्रभावी ठरत नाहीत.
म्हणून कट्टरवादी प्रेम आणि अमली पदार्थांचे व्यसन अशा प्रकारातून तरुणींना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करतात. या प्रकारातून केरळमधील अनेक हिंदू आणि ख्रिश्चन मुलींचे धर्मांतर करण्यात आले. नंतर त्यांना अफगाणिस्तानातील दहशतवादी शिबिरांमध्ये पाठविण्यात आले.
असे प्रकार अस्तित्वात असल्याच्या गोष्टी अनेक राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार नाकारतात. पण, त्यामागे त्यांचे स्वत:चे काही स्वार्थ हेतू असावेत. काहीही असले, तरी या प्रकरणांची गंभीरतेने दखल घेणे आवश्यक असून, अशा जिहादींचा छडा लावणेही गरजेचे आहे, असे बिशप म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App