वृत्तसंस्था
नवी दिल्ली : कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यास मृत्यूचा धोका ९७ टक्क्यांनी कमी होतो. तसेच एकच डोस घेतल्यामुळे ९६ % संरक्षण होते, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. Both doses of corona vaccine reduce the risk of death by 97%; protection with a single dose will be 96%
केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने याबाबतची माहिती आज दिली. एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या लसीकरण मोहिमेच्या आधारे हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एप्रिल आणि मे दरम्यान मृत्यूचे प्रमाण मोठे होते. लोकांनी आरोग्याची काळजी घेतली नाही. त्याचा हा मोठा फटका बसला. त्यांनी या काळात लसीचा एकही डोस घेतला नव्हता. त्यामुळे मृत्यू वाढले. कोविड टास्क फोर्सचे प्रमुख वीके पॉल नम्हणाले, लस हा कोरोनाविरुद्ध मोठे शस्त्र आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लसीकरण लोकांनी करून घेतले पाहिजे.
शाळा उघडण्यासाठी लसीची अट नाही
शाळा सुरु करण्यासाठी लसीची अट नाही, असे नीति आयोग के सदस्य आरोग्यचे डॉ. वीके पॉल यांनी सांगितले.परंतु शाळेतील स्टाफला लस घेणे अनिवार्य आहे. दुसरीकडे मुलांच्या लसीकरणासाठी सरकार मात्र गांभीर्याने विचार करत आहे.
देशात ७२ कोटीवर लोकांना लस दिली आहे. १८ वर्षांवरील ५८ टक्के लोकांना एक डोस दिला आहे. ते अधिक वाढविणे म्हणजेच १०० टक्के करणे गरजेचे आहे. हर्ड इम्यूनिटीसाठी ते आवश्यक आहे. तसेच कोणीही लसीकरणातून सुटता कामा नये.
सणामध्ये खबरदारी आवश्यकच
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले, कोरोनाची दुसरी लाट संपलेली नाही. सणामध्ये लोकांनी निष्काळजीपणा करू नये. कोरोनाच्या नियमांचे पालन करून सण साजरे करावे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App