आर्कटिक भागामध्ये आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यानंतर काय करावे यासाठी प्रशासन मॉक ड्रील घेत होते. दरम्यान येवगेनी जिनिचेव हे मॉक ड्रीलमध्ये सहभागी झाले होते. Russian minister dies while rescuing photographer during mock drill
विशेष प्रतिनिधी
मॉस्को : मॉक ड्रील करताना रशियाच्या मंत्र्याचा मृत्यू झाला आहे. रशियाचे आपात्कालीन मंत्री येवगेनी जिनिचेव हे एका फोटोग्राफरचा जीव वाचवण्यास गेले आणि त्यांना अपघात झाला. ही संपूर्ण माहिती रशियन राष्ट्रपती कार्यालयाचे प्रवक्ते दिमित्री पेसकोव यांनी दिली.
रशियन राष्ट्रपती कार्यालय क्रेमिलनकडून मिळालेल्या माहितीनुसार, आपत्कालीन मंत्री येवगेनी जिनिचेव यांचे आर्कटिकमध्ये निधन झाले.
आर्कटिक भागामध्ये आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यानंतर काय करावे यासाठी प्रशासन मॉक ड्रील घेत होते. दरम्यान येवगेनी जिनिचेव हे मॉक ड्रीलमध्ये सहभागी झाले होते.यावेळी विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. मंत्री येवगेनी जिनिचेव एका कड्याजवळ उभे होते. त्याच वेळेस कॅमेरामनचा पाय घसरल्याने तो खाली पडला.
त्या फोटोग्राफरला वाचविण्यासाठी येवगेनी जिनिचेव यांनी पाण्यात उडी घेतली. मात्र,दुर्दैवाने ते एका मोठ्या खडकावर आपटले.दरम्यान ते गंभीर जखमी झाले.या जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी रशियाच्या मंत्र्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App