Antilia Bomb Scare : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कुटुंबाला धमक्या मिळण्याची बाब काही नवीन नव्हती. यापूर्वीही धमक्या मिळाल्या होत्या. पण जेव्हा त्यांची पत्नी नीता अंबानी यांना मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांबद्दल माहिती मिळाली, तेव्हा त्यांना धक्काच बसला. त्यांनी तत्काळ त्यांचा गुजरात दौरा रद्द केला. मुंबईतील मुकेश अंबानी कुटुंबाच्या अँटिलिया निवासस्थानी असलेल्या सुरक्षा प्रमुखांनी एनआयएला ही माहिती दिली आहे. NIA Charge Sheet Antilia Bomb Scare Nitia Ambani Cancelled Gujrat Tour As She Knew Bomb Threat
विशेष प्रतिनिधी
मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कुटुंबाला धमक्या मिळण्याची बाब काही नवीन नव्हती. यापूर्वीही धमक्या मिळाल्या होत्या. पण जेव्हा त्यांची पत्नी नीता अंबानी यांना मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांबद्दल माहिती मिळाली, तेव्हा त्यांना धक्काच बसला. त्यांनी तत्काळ त्यांचा गुजरात दौरा रद्द केला. मुंबईतील मुकेश अंबानी कुटुंबाच्या अँटिलिया निवासस्थानी असलेल्या सुरक्षा प्रमुखांनी एनआयएला ही माहिती दिली आहे.
मुकेश अंबानींच्या निवासस्थानाच्या सुरक्षा प्रमुखांनी सांगितले की, अँटिलियाच्या बाहेर स्फोटक वाहनाची आणि धमकीची चिठ्ठी सापडल्याची माहिती मिळताच नीता अंबानी यांनी लगेचच त्यांचे पती मुकेश अंबानी यांना ही गोष्ट सांगितली. त्या दिवशी त्या गुजरातच्या जामनगर येथे एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार होत्या. त्यानंतर त्यांचा कार्यक्रम प्रथम पुनर्निर्धारित करण्यात आला. पण नंतर त्या भागातील पोलीस उपायुक्त (डीसीपी) च्या सल्ल्याने नीता अंबानींनी तो दौरा रद्द केला.
25 फेब्रुवारी रोजी एनआयएने अंबानींच्या घराजवळ जिलेटिनच्या काड्यांसह एक एसयूव्ही वाहन सापडल्यानंतर सुरक्षा प्रमुखांचा हा जबाब नोंदवला. अंबानींच्या निवासस्थानाच्या सुरक्षा प्रमुखांचे हे निवेदन व्यापारी मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी बडतर्फ केलेले पोलीस अधिकारी सचिन वाजे आणि इतर नऊ जणांविरोधात एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रात नोंदवले आहे. एनआयएने 3 सप्टेंबर रोजी विशेष न्यायालयात हे आरोपपत्र दाखल केले आहे.
अंबानींच्या निवासस्थानाच्या सुरक्षा प्रमुखांनी एनआयएला सांगितले की, पूर्वीही अनेक ठिकाणांहून धमक्या येत होत्या. पण त्या सर्व धमक्या ऑक्टोबर २०२० मध्ये सुरू झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाशी संबंधित होत्या. परंतु 24-25 फेब्रुवारीच्या रात्री मायकल रोडवरील अंबानींच्या निवासस्थानाबाहेर एक स्कॉर्पिओ कार बेवारस अवस्थेत आढळली. त्या कारमध्ये काही जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र सापडले. या पत्राबद्दल माहिती मिळताच नीता अंबानींनी लगेच मुकेश अंबानींना कळवले आणि गुजरातला जाण्याचा त्यांचा कार्यक्रम रद्द केला. त्याचबरोबर सुरक्षा प्रमुखांनी असेही सांगितले आहे की, मुकेश अंबानी आणि नीता अंबानी स्फोटकांनी भरलेली कार शोधण्याच्या बाबतीत कोणत्याही विशिष्ट व्यक्तीवर संशय घेत नाहीत.
दरम्यान, एनआयएने आपल्या चार्जशीटमध्ये त्या कारचे मालक मनसुख हिरेन यांच्या हत्येचा खुलासाही केला आहे. एनआयएने बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाजे याचे मुख्य आरोपी म्हणून नाव दिले आहेत. सचिन वाजे यांनीच हिरेनला माजी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माला सुपारी देऊन मारले. सचिन वाजे यांना भीती होती की, हिरेन मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्याचा त्यांचा कट उधळून लावेल. हिरेनने दावा केला होता की, त्याची कार चोरीला गेली आहे. यानंतर त्याचा मृतदेह 5 मार्च रोजी ठाण्याजवळ मुंब्राच्या खाडीत सापडला.
NIA Charge Sheet Antilia Bomb Scare Nitia Ambani Cancelled Gujrat Tour As She Knew Bomb Threat
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App