वृत्तसंस्था
काबूल : अफगाणिस्तानातल्या पंजशीर खोऱ्यावर अखेर तालिबान्यांनी कब्जा केला. अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर तालिबानी पंजशीर खोरे मात्र ताब्यात घेणे शक्य होत नव्हते. कारण तेथे नॉर्दन अलायन्सच्या फौजांचा कडवा प्रतिकार होत होता. त्यामुळे तालिबान्यांचे प्रयत्न फोल ठरत होते. अखेर सोमवारी, ६ सप्टेंबर रोजी तालिबान्यांनी पंजशीर खोरे ताब्यात घेतले. तरीही नॉर्दन अलायन्सने हार मानलेली नाही. उलट लढा चालू ठेवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. Taliban claims complete control of Afghanistan’s Panjshir
पंजशीरच्या खोऱ्यात तालिबानी आणि नॉर्दन अलायन्स यांच्यात संघर्ष सुरु होता. सोमवार हा तालिबान आणि नॉर्दन आघाडीतील युद्धाचा शेवट दिवस ठरला. तालिबानने आता पंजशीर खोरेही आपल्या ताब्यात घेतले आहे. याबाबतची अधिकृत माहिती तालिबानकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता संपूर्ण अफगाणिस्तानात तालिबानने नियंत्रण मिळवले आहे. १५ ऑगस्ट रोजी काबूलवर ताबा मिळवल्यानंतर केवळ पंजशीर हेच तालिबानच्या नियंत्रणात नव्हते.
Taliban claims complete control of Afghanistan’s Panjshir https://t.co/ozfm1NXq6J — Al Jazeera English (@AJEnglish) September 6, 2021
Taliban claims complete control of Afghanistan’s Panjshir https://t.co/ozfm1NXq6J
— Al Jazeera English (@AJEnglish) September 6, 2021
पंजशीरमध्ये नॉर्दन आघाडीचे प्रमुख अहमद शाह मसूद यांचा मुलगा अहमद मसूद आणि अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांच्या नेतृत्वात तालिबानविरोधात लढा दिला जात होता. तालिबान्यांनी पंजशीर खोऱ्यातील नागरिकांची रसद बंद केली होती. वीज पुरवठा, पाणी पुरवठा बंद केला होता. त्याच बरोबर वैद्यकीय सेवाही बंद केली होती, असे ट्विट माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह केले होते. यानंतर अवघ्या तीन दिवसांतच पंजशीर तालिबान्यांनी ताब्यात घेतले. यानंतर तालिबानने पंजशीरची राजधानी बझारक येथे आपला झेंडा फडकवला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App