विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यावर नुकतीच गुडघा प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून ते विश्रांती घेत आहेत.Knee transplant surgery on BJP national president JP Nadda
नवी दिल्ली येथील इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयात नड्डा यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर काही दिवस त्यांना विश्रांती घ्यावी लागणार आहे. या काळात त्यांना नव्याने बसविलेल्या (इंप्लांट केलेल्या) गुडघ्यावर चालण्याचा सराव करता येईल. त्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार आहे.
गेल्या वर्षी नड्डा यांनी अमित शहा यांच्याकडून भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली होती. तेव्हापासून ते सतत धावपळ करत आहेत. पश्चिम बंगाल, आसाम, तामीलनाडूसह निवडणुका होणाऱ्या विविध राज्यांच्या निवडणुका झाल्या.
त्याच्या प्रचाराची पूर्ण जबाबदारी नड्डा यांनी घेतली होती. लवकरच पाच राज्यांच्या निवडणुका होणार असून या राज्यांच्या निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळीसुरू होणार आहे. त्यामुळे नड्डा यांना प्रचाराची धुरा सांभाळावी लागणार आहे. त्यामुळे त्यांनी ही शस्त्रक्रिया करून घेतली आहे.
योगायोगाने, 2001 मध्ये, तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी देखील मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली होती. त्यानंतर भारतीयांच्या मनातून या शस्त्रक्रियेची भीती गेली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App