विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेपासून लाल किल्यापर्यंतचा भुयारी मार्ग सापडला आहे. दिल्ली विधानसभेचे सभापती रामनिवास गोयल यांनी याबाबतची माहिती दिली. स्वातंत्र्य सैनिकांना अटक केल्यानंतर न्यायालयीन सुनावणीसाठी त्यांना लाल किल्ल्यातून त्यावेळी न्यायालय असलेल्या दिल्ली विधानसभेच्या इमारतीत आणतांना लोकांच्या क्षोभापासून वाचण्यासाठी ब्रिटिश काळात या सुरुंगाचा वापर केला जात होता.The subway from the Delhi Legislative Assembly to the Red Fort was built by the British to transport prisoners
गोयल म्हणाले, 1993 मध्ये सर्वप्रथम मी आमदार झालो, तेव्हा दिल्ली विधानसभेच्या खाली लाल किल्ल्यापर्यंत जाणारे भूमिगत सुरुंग असल्याचे ऐकले होते. मी त्याचा इतिहासात शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण तेव्हा नेमके काही समजू शकले नव्हते. आता आम्हाला या सुरुंगाच्या तोंडाचा शोध लागला; मात्र खाली मेट्रो आणि सांडपाण्याच्या वाहिन्या असल्यामुळे सुरुंगाच्या आता आम्ही फार काही खोदकाम करू शकलो नाही.
1912 मध्ये ब्रिटिशांनी आपली राजधानी कोलकत्तावरून दिल्लीला हलवल्यानंतर दिल्ली विधानसभेची इमारत केंद्रीय विधानसभा म्हणून उपयोगात येत होती. त्यानंतर 1926 मध्ये विधानसभेच्या या इमारतीचे न्यायालयात रूपांतर केले. त्यावेळी या भूमीगत सुरुंगाच्या माध्यमातून स्वातंत्र्य सैनिकांना लालकिल्ल्यातून न्यायालयात आणले जात होते.
या सुरुंगाच्या आत फाशी देण्यासाठी त्यावेळी उपयोगात आणल्या जाणाऱ्या काही खोल्या होत्या, असे आम्ही ऐकले होते. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आता या खोल्या आम्ही हुतात्मा स्वातंत्र्यसैनिकांचे स्मारक म्हणून लोकांसाठी खुल्या करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षीच्या 15 ऑगस्टपर्यंत हे काम पूर्ण होईल, असा आमचा अंदाज आहे, असे ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App