प्रतिनिधी
नवी दिल्ली – काँग्रेसचे माजी अध्यक्ष वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी काल केंद्रातल्या मोदी सरकारला GDP वरून घेरल्यानंतर आज काँग्रेसच्या सरचिटणीस आणि उत्तर प्रदेश प्रभारी प्रियांका गांधी यांनी मोदी सरकारला दुहेरी विकासाच्या मुद्द्यावर घेरले आहे.priyanka gandhi targets modi govt over price hike of gas and other commodities
मोदींच्या अब्जाधीश मित्रांच्या संपत्तीत वाढ आणि सामान्यांना महागाईचा मार असला विकास देशाला नकोय, असे ट्विट प्रियांका गांधी यांनी करून मोदी सरकारला घेरले आहे. एकीकडे आपल्या अब्जाधीश मित्रांच्या संपत्तीत वाढ होत आहे
तर दुसरीकडे सामान्यांसाठी अत्यावश्यक असणाऱ्या एलपीजी इंधन आणि पेट्रोल-डिझेलच्या भावात वाढ होत आहे. हाच भाजपचा विकास असून आता या विकासाला माघारी पाठवण्याची गरज आहे, असे प्रियांका गांधी यांनी ट्विटमध्ये एक ग्राफ मांडून म्हटले आहे.
प्रधानमंत्री जी, आपके राज में दो ही तरह का "विकास" हो रहा है: एक तरफ आपके खरबपति मित्रों की आय बढ़ती जा रही है। दूसरी तरफ आमजनों के लिए आवश्यक वस्तुओं के दाम बढ़ते जा रहे हैं। अगर यही "विकास" है तो इस "विकास" को अवकाश (छुट्टी) पर भेजने का वक्त आ गया है।#IndiaAgainstBJPLoot pic.twitter.com/Pra7PfAQb8 — Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) September 1, 2021
प्रधानमंत्री जी,
आपके राज में दो ही तरह का "विकास" हो रहा है:
एक तरफ आपके खरबपति मित्रों की आय बढ़ती जा रही है।
दूसरी तरफ आमजनों के लिए आवश्यक वस्तुओं के दाम बढ़ते जा रहे हैं।
अगर यही "विकास" है तो इस "विकास" को अवकाश (छुट्टी) पर भेजने का वक्त आ गया है।#IndiaAgainstBJPLoot pic.twitter.com/Pra7PfAQb8
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) September 1, 2021
या ट्विटमध्ये प्रियांका गांधी म्हणतात, की मोदीजी, आपल्या राज्यात दोन प्रकारचाच विकास होतोय. एकीकडे आपल्या अब्जाधीश मित्रांच्या संपत्तीत वाढ होतेय, तर दुसरीकडे सामान्य जनतेला आवश्यक असलेल्या वस्तूंच्या महागाईमध्ये वाढ होतेय.
जर हाच ‘विकास’ असेल तर या ‘विकासा’ला आता सुट्टी देण्याची गरज आहे.”प्रियांका गांधी यांनी या दुहेरी विकासावर टीका करून राहुल गांधी यांच्या पाठोपाठ नव्या वादाला तोंड फोडले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App