प्रतिनिधी
मुंबई – ठाकरे – पवार सरकारने शिफारस केलेल्या १२ आमदारांची नियुक्ती अजून राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी केलेली नाही. पण त्या पूर्वीच महाविकास आघाडीच्या यादीतून दोन नावे कटाप झाल्याचे समजते आहे. भाजपमधून राष्ट्रवादीत येऊन ED ला CD चे प्रत्युत्तर देण्याची धमकी देणारे एकनाथ खडसे आणि राष्ट्रवादीविरोधात कोल्हापूरात मोर्चा काढणारे शेतकरी नेते राजू शेट्टी यांची नावे वगळण्यात आल्याची माहिती मिळते आहे. Eknath Khadse and Raju Shetti droped from MLC list??
गेल्या वर्षीपासून सुरू असलेला राज्यपाल नियुक्त आमदारांचा तिढा सुटलेला नसताना आता एकनाथ खडसे आणि राजू शेट्टी यांचे नाव यादीतून कट करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. राजू शेट्टी यांचे नाव राष्ट्रवादीने आपल्या यादीतून का काढून टाकले, अशी विचारणा होत असतानाच आता एक महत्वाची माहिती समोर येत आहे. त्यांनी वारंवार ठाकरे – पवार सरकार विरोधात केलेल्या आंदोलनामुळेच राजू शेट्टी यांचे नाव यादीतून काढून टाकल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळते आहे.
राजू शेट्टी यांनी नुकताच पूरग्रस्त शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला होता. या मोर्चात हजारोच्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी राजू शेट्टी यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला होता. जे सूर्याला दिसत नाही ते जयंत पाटील यांना दिसते. मोठ्या योजना आणून टेंडर काढण्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना रस आहे, अशी घणाघाती टीका शेट्टी यांनी केली होती. एवढेच नाही तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार फक्त आश्वासने देऊन गेले. ज्यांना शेती कळत नाही त्यांनी मदत केली. मात्र, ज्यांना ती कळते त्यांनी मदत द्यायला टाळाटाळ केली, अशा शब्दात राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला होता.
आता राष्ट्रवादीने राजू शेट्टींचे नाव वगळून सरकारवरील टीकेचे उट्टे काढल्याचे मानले जात आहे. तर एकनाथ खडसे यांना भोसरी एमआयडीसी जमीन गैरव्यवहार प्रकरणातली ईडीची चौकशी आणि तपास भोवल्याचे मानले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App