अफगाणमध्ये तालिबान्यांचे क्रूर नियम झाले सुरु, मुला-मुलींना एकत्र शिकण्यास मज्जाव

विशेष प्रतिनिधी

काबूल – तालिबानी राज्यात महिलांना विद्यापीठ पातळीवरील शिक्षण घेता येईल, पण तेथे मुला मुलींना एकत्र शिकण्यास परवानगी देणार नसल्याचे तालिबानच्या प्रभारी उच्च शिक्षण मंत्री अब्दुल बकी हक्कानी याने स्पष्ट केले आहे. boys and girls cant teach together in Afghanistan

अफगाणिस्तानमधील प्रमुख वृत्तवाहिनी ‘टोलो न्यूज’ने वृत्त दिले आहे. अफगाणिस्तानातील वरिष्ठ सदस्यांच्या बैठकीत हक्कानी याने हा नवा नियम जाहीर केला. देशातील सरकारी आणि खासगी महाविद्यालयामधील कर्मचारीही या बैठकीला उपस्थित होते.



 

मुलींनी विद्यापीठात शिकण्यास परवानगी असेल, मात्र विद्यापीठ व शालेय पातळीवर मुले-मुलींना एकत्र शिकता येणार नाही. इस्लामी कायद्यानुसार महिला व पुरुष वेगवेगळ्या वर्गात शिकवणे पुढे चालू ठेवू शकतात. आणखी एका वृत्तानुसार विद्यार्थिनींना महिलांना शिकविण्यास मनाई केली आहे. यामुळे महिलांच्या उच्च शिक्षणात अडथळे येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

अफगाणिस्तानवर आता तालिबानची सत्ता सुरू झाल्याची ही सारी चिन्हे दिसू लागली आहेत. या कडव्या दहशतवादी संघटनेने देशावर ताबा मिळविल्यापासून महिला व कलावंत भीतीच्या छायेखाली आहेत.

boys and girls cant teach together in Afghanistan

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात