
Afghanistan Crisis : अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेल्या भारतीयांना बाहेर काढण्याची मोहीम थांबवण्यात आली आहे. भारतीय हवाई दलाने (IAF) अफगाण नागरिकांना तसेच भारतीय अधिकारी आणि नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशनमध्ये सहभागी असलेली सर्व विमाने आणि कर्मचारी परत आणले आहेत. Afghanistan crisis Indian Air Force called its All aircraft returned from Tajikistan
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेल्या भारतीयांना बाहेर काढण्याची मोहीम थांबवण्यात आली आहे. भारतीय हवाई दलाने (IAF) अफगाण नागरिकांना तसेच भारतीय अधिकारी आणि नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशनमध्ये सहभागी असलेली सर्व विमाने आणि कर्मचारी परत आणले आहेत. काबुलमध्ये अडकलेल्यांना मदत करण्यासाठी ताजिकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये तैनात केल्यानंतर C-17 आणि C-130J विमाने आपापल्या ठिकाणी परत आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
भारताने आपली काही विमाने ताजिकिस्तानच्या दुशान्बे येथील आयनी एअरबेसवर तैनात केली होती. काबूलहून दुशान्बे येथे प्रवाशांना आणण्यासाठी C-130Js चा वापर केला गेला, जिथून त्यांना भारतात परत आणण्यात आले. मझार-ए-शरीफ आणि कंधार वाणिज्य दूतावासात अडकलेल्या भारतीय अधिकाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी भारतीय वायुसेनेच्या विमानांचा वापर करण्यात आला.
बिकट परिस्थितीत राबवली मोहीम
तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर अत्यंत बिकट स्थितीत मोहीम राबवली, कारण विमानाला उड्डाण करण्यासाठी धावपट्टी साफ करावी लागली. सूत्रांनी सांगितले की, यासाठी भारतीय हवाई दलाच्या गरुड कमांडोनी इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस (ITBP) च्या जवानांशी हातमिळवणी केली होती, जेणेकरून C-17 भारतीय अधिकाऱ्यांसह उड्डाण करू शकेल.
अफगाणिस्तानातून लोकांना भारतात परत आणण्यासाठी एअर इंडियाच्या विमानांचाही वापर करण्यात आला. काही दिवसांपूर्वी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, “आम्ही काबूल किंवा दुशान्बे येथून सहा वेगवेगळ्या फ्लाइटमध्ये 550 हून अधिक लोकांना बाहेर काढले आहे. त्यापैकी 260 पेक्षा जास्त भारतीय होते. भारत सरकारने इतर एजन्सींच्या माध्यमातून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यात मदत केली. आम्ही अमेरिका, ताजिकिस्तानसारख्या वेगवेगळ्या देशांच्या संपर्कात होतो.
अमेरिकन सैन्याची माघारही पूर्ण झाली
त्याच वेळी अफगाणिस्तानातून सर्व अमेरिकन सैन्य मागे घेणेदेखील झाले आहे. अफगाणिस्तानातून बाहेर पडलेले शेवटचे अमेरिकन सैनिक मेजर जनरल ख्रिस डोनाह्यू यांच्या परत येण्याने काबूलमधील अमेरिकेची बचाव मोहीम संपली. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिन्केन म्हणाले की, अमेरिका प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मदत करण्यास वचनबद्ध आहे, जो अफगाणिस्तान सोडू इच्छितो. यासह, अमेरिकेने अफगाणिस्तानमधील राजनैतिक उपस्थितीदेखील स्थगित केली आहे.
Afghanistan crisis Indian Air Force called its All aircraft returned from Tajikistan
महत्त्वाच्या बातम्या
- अमेरिकी सैन्याच्या पूर्ण माघारीनंतर तालिबान्यांनी केला जल्लोष, काबूलमधली शाळकरी चिमुरडी म्हणते, भीती वाटत नाही!
- मोठी बातमी : सुप्रीम कोर्टाचा सुपरटेक एमराल्डला दणका, 40 मजली दोन्ही टॉवर पाडण्याचे, खरेदीदारांना व्याजासह पैसे परत करण्याचे आदेश
- Bollywood Drug Case : अरमान कोहलीच्या मोबाइलमधून धक्कादायक खुलासा, पेरू-कोलंबियाहून ड्रग्जचा पुरवठा; मोठ्या ड्रग कार्टेलशी संबंध
- राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यावर ट्रम्प संतापले, म्हणाले की- सैन्य माघारी घेण्याची मोहीम कधीही एवढ्या वाईट पद्धतीने राबवली गेली नाही
- कॅगने केले ममता सरकारचे कौतुक, म्हटले – ‘लॉकडाऊन असूनही, जमाखर्चाचा ताळेबंद १०० % जुळला