वृत्तसंस्था
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील हंडवारा येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण आज मोठ्या उत्साहात काश्मिरी पंडितांनी साजरा केला. विशेष म्हणजे गेल्या ३२ वर्षात प्रथमच अशा प्रकारे उत्साहात श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात आली आहे.Shrikrishna Janmashtami celebrations at Handwara in Kashmir; Kashmiri Pandit celebrated after 32 years
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त काश्मिरी पंडितांनी लाल आणि भगवे ध्वज हातात धरून हंडवारा येथे मिरवणूक काढली. देशात ज्या प्रमाणे श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी होते. त्या परंपरेप्रमाणे हा उत्सव येथे साजरा करण्यात आला.
उत्सवात सामील झालेले सामाजिक कार्यकर्ते घ मोही उद्दीन झाब म्हणाले, श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण काश्मीरमध्ये तब्बल ३२ वर्षांनंतर उत्साहात प्रथम साजरा झाला. आम्ही तो आमचे बांधव काश्मिरी पंडितांसमवेत साजरा करत असल्याने आनंद वाटला. या माध्यमातून काश्मीरमध्ये पुन्हा बंधु भावाच्या प्रेमाचे वारे वाहू लागले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App