विशेष प्रतिनिधी
वर्धा : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे बांधावर जात नाहीत. शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेत नाहीत अशी टीका राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीत सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत करण्यात आली.पवार साहेबांनी रक्ताचं पाणी केलं म्हणून राष्ट्रवादी आज जिवंत आहे. हे जर खरं असेल तर राष्ट्रवादी कुठे चालली आहे, याचा विचार करायला हवा, असा घरचा आहेर राष्ट्रवादीच्या माजी आमदाराने दिला आहे.Chief Minister Uddhav Thackeray did not go to the farm, did not meet the farmers, criticism from NCP workers in the presence of Supriya Sule
वर्धा येथे राष्ट्रवादीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सुप्रिया सुळे यांच्यासमोरच बोलताना माजी आमदार राजू तिमांडे म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतानाही वर्धा जिल्हा दुष्काळमुक्त होऊ शकला नाही. महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यां ना भेटत नाहीत.
केवळ शरद पवार यांच्यामुळेच महाराष्ट्रात संघटना आहे. आज महाराष्ट्रात आघाडीचं सरकार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीचे मंत्री मंत्रालयात बसतात. पण, मुख्यमंत्री बांधावरच्या शेतकऱ्यांना भेटू शकत नाहीत, ही शोकांतिका आहे. शरद पवार हे शेतकºयांना भेटायचे, पण हे मुख्यमंत्री कुणाला भेटत नाही.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे, तिन्ही पक्ष एकमेकांच्या हातात हात घालून चालतात. मात्र, अनेकदा स्थानिक पदाधिकाºयांना एकमेकांचे पाय ओढावे लागतात. त्यातून, जुळवून घ्यावे लागते. जोपर्यंत कोरोनाचा नायनाट होत नाही, तोपर्यंत कुठलाही राष्ट्रवादीचा कार्यक्रम वर्ध्यात घेऊ नका. शरद पवार यांनाही दिवाळी नंतरच इकडे पाठवा.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App