कोणत्याही क्षेत्रात आपल्या व्यक्तीमत्वाची छाप पाडायची असेल, यश मिळवायचे असेल तर संवाद प्रक्रियेला अनन्साधारण महत्व असते. ज्यांना हे महत्व कळते ते त्यांच्या क्षेत्रात यशाला गवसणी घालतात. आपण दुसऱ्याशी संवाद का साधतो? एक तर दुसऱ्याला काही माहिती देण्यासाठी. दुसऱ्याकडून काम करवून घेण्यासाठी. सांगितलेले काम नीट झाले आहे किंवा नाही हे पहाण्यासाठी तसेच दुसऱ्याकडून काही मागण्यासाठी. या चार प्रकारचा संवाद साधण्यासाठी खालील प्रक्रिया वापरण्यात येते. काय सांगावयाचे आहे ते शब्दबद्ध करणे, योग्य माध्यमाद्वारे संदेश वहन करणे, ज्याला संदेश पाठवला आहे तो संदेश ग्रहण करतो व मिळालेल्या संदेशाचा अर्थ लावतो. ज्याने संदेश पाठविला आहे त्याला आपण लावलेला अर्थ कथन करणे अथवा अडचण असल्यास ती सांगणे फार महत्वाचे असते. या सर्व प्रक्रियेत ऐकण्याला अनन्यसाधारण असे महत्व आहे. यात काही अडथळेही असतात. प्रेषक संदेश सूत्रबद्ध करून तो टेलिफोन, फॅक्स, पत्र, किंवा समोरासमोर संभाषणातून ग्राहकापर्यंत पोचवत असतो. संदेश काही वेळा ग्राहकापर्यंत जसाच्या तसा पोहोचेलच असे नाही. त्यात अडथळे निर्माण होतात. Life Skills: For success, for progress, remove the obstacles in communication immediately
ते अडथळे तीन प्रकारचे असू शकतात. तांत्रिक स्वरूपाचे, मानसशास्त्रीय स्वरूपाचे, भाषिक भेदामुळे निर्माण होणारे. अनेकवेळा टेलिफोनवरील संभाषण दुसऱ्या टोकाला नीट ऐकू जात नाही. मानसशास्त्रीय स्वरूपाचे अडथळे म्हणजे मिळालेल्या माहितीचा पूर्वग्रहदूषित दृष्टीने अर्थ लावणे किंवा आपल्याला श्रेयस्कर अर्थ त्यातूनच काढणे. प्रेषक रागावलेला, चिंताग्रस्त, भयग्रस्त असेल तर त्याचा त्याच्या विचारावर परिणाम होऊन तो योग्य रीतीने आपले म्हणणे तयार करू शकत नाही. याउलट ग्राहक भावनिक असेल तर तो संदेशाचे ग्रहण नीट करू शकत नाही. संपूर्णपणे ऐकण्यापूर्वीच संदेश मध्ये तोडणे अगर त्यावर विचार करण्यापूर्वीच अधीरपणाने मत दिल्याने अडथळा निर्माण होतो. यातील महत्वाचा भाग म्हणजे लक्षपूर्वक ऐकण्याचा अभाव. काही वेळा एकाच वेळी अनेक गोष्टी करीत असतो. अन्य काही काम करताना आलेला संदेश नीट ऐकत नाही. त्याकडे दुर्लक्ष होते. कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक व स्थिर चित्ताने केल्यास हा अडथळा दूर होऊ शकतो. जो या अडथळ्यावंर योग्य प्रकारे मात करू शकतो तो जीवनात यशस्वी होतोच.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App