विशेष प्रतिनिधी
काबूल : तालीबान्यांची सत्ता आल्यानंतर अफगाणिस्तानातून बाहेर पडण्यासाठी काबूल विमानतळावर जमलेल्या लोकांसाठी परिस्थिती अत्यंत बिकट होत आहे. खाद्यपदार्थांच्या किमतीही मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. पाण्याच्या बॉटलसाठी 40 डॉलर्स म्हणजे सुमारे 3 हजार रुपये आणि जेवणासाठी100 डॉलर्स म्हणजे सुमारे साडे सात हजार रुपये मोजावे लागत आहे.A bottle of water costs Rs 3,000, Rs 7,000 for a one-time meal, Afghans at Kabul airport
महागाईमुळे तेथे जमलेल्या हजारो लोकांसाठी परिस्थिती अत्यंत कठीण बनत आहे. धक्कादायक म्हणजे खाण्या -पिण्याच्या किंमती अफगाणी चलनात लोकांकडून घेतल्या जात नाहीत. यासाठी त्यांना फक्त डॉलर्स द्यावे लागत आहे. काबूल विमानतळाबाहेरील काही व्हिडिओ समोर येत आहेत. यामध्ये लोक गुडघ्यापर्यंत पाणी आणि कचऱ्यामध्ये उभे असल्याचे दिसत आहे.
अफगाणिस्तानचे नागरिक फजलूर रहमान यांनी सांगितले की लोक काँक्रीटची भींत आणि काटेरी तारांच्या मागे उभे आहेत. जर कोणी भिंतीवर चढण्याचा प्रयत्न केला तर सुरक्षा कर्मचारी त्याला मागे ढकलून देतात. वस्तूंच्या किमती इतक्या वाढल्या आहेत की सामान्यांना ही किंमत देणे शक्य होत नाही. लोक सतत येत आहेत. गर्दी प्रचंड वाढत आहे.अशा स्थितीत महिला आणि मुलांची स्थिती बिकट होत आहे.
दरम्यान, एका अमेरिकन सैनिकाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो अफगाण मुलांना पाणी देताना दिसत आहे. मुले त्याला पाहून हसत आहेत. मात्र, हा फोटो कधी काढला गेला हे अद्याप कळू शकलेले नाही. अमेरिकेच्या संरक्षण विभागाने याला दुजोरा दिलेला नाही. पण लोक व्हिडिओ पाहिल्यानंतर म्हणत आहेत की संकटातही आशा जिवंत आहे.
एक अहवालानुसार प्रत्येक तीन अफगाणांपैकी एक म्हणजे सुमारे 14 दशलक्ष लोक भुकेले आहेत. 20 लाख मुले कुपोषित आहेत आणि त्यांना त्वरित मदतीची गरज आहे. पिके नाहीत, पाऊस नाही, पिण्याचे पाणी नाही, लोक गरिबीत जगत आहेत. त्यांची परिस्थिती अत्यंत वाईट झालेली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App